Lokmat Sakhi >Celebrity Corner > नाही आता जगायचे, मला मरू द्या! - दुखण्याने बेजार मधुबाला शेवटी हताश झाली होती कारण..

नाही आता जगायचे, मला मरू द्या! - दुखण्याने बेजार मधुबाला शेवटी हताश झाली होती कारण..

Madhubala's Last Words : वयाच्या ३६व्या वर्षीच भारताची लावण्यवती स्वर्गवासी झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2025 13:38 IST2025-01-20T13:37:13+5:302025-01-20T13:38:32+5:30

Madhubala's Last Words : वयाच्या ३६व्या वर्षीच भारताची लावण्यवती स्वर्गवासी झाली.

Madhubala's Last Words | नाही आता जगायचे, मला मरू द्या! - दुखण्याने बेजार मधुबाला शेवटी हताश झाली होती कारण..

नाही आता जगायचे, मला मरू द्या! - दुखण्याने बेजार मधुबाला शेवटी हताश झाली होती कारण..

एखादी व्यक्ती एवढी सुंदर असते की तिचे नावच उपमा बनून जाते. जसं की मधुबाला.मधुबालांचे सौंदर्य इतके मोहक होते की, त्यांचे नाव सौंदर्याच्या उपमांमध्ये जोडले गेले. एखाद्या सुंदर मुलीला अगदी मधुबालाच दिसतेस अशी उपमा दिली जाते. मुळात हे सौंदर्य नैसर्गिक होतं.(Madhubala's Last Words) चेहर्‍याशी काहीही छेडछाड मधुबालांनी कधीच केली नाही. एखाद्याचा चेहरा बोलका असतो. हे मधुबालांनी प्रत्येक गाण्यात सिद्ध केले आहे. (Madhubala's Last Words)     

 मधुबालांनी त्यांच्या क्षेत्रातील अनेक विक्रम नक्कीच मोडीत पाडले असते. मात्र देवाच्या मनात काही वेगळंच होतं.१९५४ला बहूत दिन हुए चित्रपटाचं चित्रिकरण सुरू असताना मधुबालांना रक्ताची उलटी झाली. कंजेनिटल हार्ट डिझिस असल्याचे कळले.(Madhubala's Last Words) तरी सुद्धा त्यांनी काम चालू ठेवले. मुघल-ए-आझम सारख्या चित्रपटात काम केले. हा सिनेमा आजही वन ऑफ द क्लासिक्स मानला जातो. आजाराकडे दुर्लक्ष करत त्यानी काम सुरूच ठेवले. मनात जिद्द होती पण हळूहळू शरीराने साथ देणे बंद केले.

मनिकंट्रोलवर मधुबालांची बहि‍ण मधुर भुषण यांनी सांगितले की, मधुबालांनी उपचार बंद करूया असा प्रस्ताव कुटुंबियांसमोर ठेवला होता. मधुबाला म्हणाल्या, "मी काही जगायचे नाही. माझा मृत्यू निश्चित आहे. माझ्या उपचारांवर पैसे वाया घालवू नका." डॉक्टरांनी जास्तीत जास्त मधूबाला दोन वर्ष जगतील असे विधान केले होते. पण तरी पुढे ९ वर्षे त्या जगल्या. २चे नऊ झाल्यामुळे त्याच्यात धीर आला होता. आता काय मी जात नाही असं म्हणून त्यांची  जिद्द परत येत होती. पण तब्येत अचानक आणखी खालवली. 

शरीराबरोबरच मन खचलं आणि चेहराही. सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मधूबालांना स्वत:चाच चेहरा बघवत नव्हता. त्यांनी लोकांना भेटणे वगैरे बंद करून टाकले. स्वत:ला घरात कोंडून घेतले. जगाशी संबंध तोडून टाकले. २३ फेब्रुवारी १९६९ला वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी भारतातील एक सुंदर चेहरा पडद्या आड गेला. शेवटचे काही दिवस, "मला मरायचे नाही अजून जगायचे आहे." असं त्या म्हणत होत्या. त्यांचे शेवटचे शब्द, "आता मला शांततेत जाऊ द्या" असे होते. मधुबालांच्या वडिलांनी देवाकडे "तिला सोडा. मला घेऊन जा" अशी प्रार्थना सतत केली. पण आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. भारताने एक सुंदर व्यक्तिमत्व गमवले.          
 

Web Title: Madhubala's Last Words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.