Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवच्या लग्नात पहाडी जेवणाचा थाट, भांगेची चटणी-भगरीची खीर-पाहा भन्नाट मेन्यू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2026 17:51 IST

Kuldeep Yadav Wedding: A feast of pahadi food at Kuldeep Yadav's wedding, look at the amazing menu.. : कुलदीप यादवच्या लग्नात पहाडी पदार्थांची मेजवानी.

सचिन तेंडुलकरच्या लेकाच्या लग्नात मराठी पदार्थांची रेलचेल होती, आता भारतीय स्पिनर कुलदीप यादवचंलग्न आहे, ते ही मसूरीत. म्हणजे पहाडांत आणि तिथल्या पारंपरिक पहाडी पदार्थांची मेजवानी पाहुण्यांना दिली जाणार आहे. (Kuldeep Yadav Wedding: A feast of pahadi food at Kuldeep Yadav's wedding, look at the amazing menu..)एका थाळीची किंमत सहा ते वीस हजार रुपये असल्याचे विविध बातम्या सांगतात. पण ती किंमत महत्वाची नाही विशेष आहे ते म्हणजे या पदार्थांत कॉण्टिनेंटल नाही पहाडी स्थानिक भोजन असेल. लग्नात स्थानिक पदार्थांचं पुनरागमन होतंय ही आनंदाचीच गोष्ट आहे. पाहूया आहे काय नेमका पहाडी मेन्यू?

 कुलदीप यादव त्याची बाल मैत्रीण वंशिका हिच्याशी १४ मार्च रोजी लग्न करतोय. हा भव्य सोहळा उत्तराखंडमधील सुंदर डोंगराळ भागात, मसूरी येथील ऐतिहासिक आणि आलिशान The Savoy Hotel Mussoorieमध्ये होणार आहे. या डेस्टिनेशन वेडिंगसाठी पूर्ण हॉटेलच बूक करण्यात आलं आहे. जगभरातून मान्यवर व्हिआयपी तर येणार आहेतच. त्यांच्यासाठी मेन्यू अगदीच खास आहे. पहाडी पदार्थ त्यातलं खास आकर्षण. त्यात मुख्य म्हणजे मडुवे की रोटी असेल. उत्तराखंडात आवडीने खाल्ला जाणारा लाल भात. गहत की दाल असे पौष्टिक पदार्थ. तसेच फानू म्हणजेच कुळथाची खास स्थानिक चवीची उसळ, चैसून.. म्हणजेच उडदाच्या डाळीचा पदार्थ. आपल्याकडे घुटं करतात तसा साधारण हा पदार्थ असतो. कंडाली का साग म्हणजे एकप्रकारची पालेभाजी असते. तिला बिच्छू घास असंही म्हणतात. काहीजण संजीवनी घासही म्हणतात.  कुमाऊंनी रायता म्हणजेच काकडीची पहाडी पद्धतीची कोशिंबीर असे काही पदार्थ आहेत.

आणखी एक खास पदार्थ आहे ज्याला भांग की चटणी म्हणतात. हा उत्तराखंडमधील प्रसिद्ध पारंपरिक पदार्थ आहे. भांगेच्या बिया भाजून त्यात हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि मसाले घालून ही चटणी वाटतात. तिची चव खमंग आणि थोडी तिखट असते. साध्या जेवणालाही ही चटणी वेगळीच चव देते म्हणून ती पहाडी जेवणात हमखास असतेच. लग्नात गोडाधोडाचे पदार्थ तर हवेच. त्यामुळे झंगोरे की खीर हा खास गोड पदार्थ केला जाईल. झंगोरा म्हणजे भगर किंवा वरी. तीच जी आपण उपासाला खातो ती. दूध, साखर आणि सुकामेवा घालून केलेली ही भगरीची खीर पचायला हलकी, पौष्टिक आणि पारंपरिक असल्यामुळे उत्तराखंडमध्ये लग्नसमारंभ आणि सणावारांना खास केली जाते. दिसतं असं की पदार्थ स्थानिक चवीचे आणि स्थानिक जगण्यात मान असलेले आहेत. लग्नसमारंभात खाद्यप्रतिष्ठेचा हा नवीन ट्रेंड चांगला आहे हे नक्की..

English
हिंदी सारांश
Web Title : Kuldeep Yadav's Wedding: Pahadi feast with unique local Uttarakhand dishes.

Web Summary : Kuldeep Yadav's wedding in Mussoorie features a Pahadi cuisine feast. The menu includes local delicacies like Maduve ki Roti, red rice, Gahut ki Dal, and Bhang ki Chutney. Traditional sweets like Jhangore ki Kheer are also served, showcasing Uttarakhand's culinary heritage.
टॅग्स :कुलदीप यादवलग्नअन्नसोशल मीडियासोशल व्हायरलउत्तराखंड