वेगवेगळ्या फेअरनेस क्रिमच्या जाहिराती आपण बघतो आणि त्याचा फार विचार करत नाही. पण कधी त्या निरखून ऐका. त्यात आपण सतत काळी त्वचा किंवा आठवडाभरात गोरे व्हाल असे दावे असतात. (Kangana Ranaut's question about colorism in bollywood)या वाक्यांवरच तर ती प्रॉडक्ट्स विकली जातात. पण दोष त्या जाहिरातीपेक्षा ती बघणाऱ्यांच्या मानसिकतेचा आहे. भारतीयांची त्वचा मुळात गहूवर्णीय आहे. आपल्या देशात देवालाही सावळ्याची उपमा दिली जाते. मग एखाद्या व्यक्तीच्या सावळ्या रंगाचे रूपांतर शुभ्र वर्णात करण्याचा अट्टहास का? 'साखरेसारखा रंग हवा' वगैरे बोलण्याच्या पद्धती बंद झाल्या पाहिजेत.(Kangana Ranaut's question about colorism in bollywood)
आपल्याकडे मुलामुलींना खासकरून मुलींना रंगावरून ऐकावं लागतं. एवढंच नाही तर लहानपणापासूनच घरचे तोंडाला बेसन फासून फासून लावतात. अगदी बाळांनाही रगडून गोरं करण्याचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी केला जातो. रंग सावळा असण्यात काही गुन्हा नाही, काही चूक नाही, मग अशी वागणूक का दिली जाते?(Kangana Ranaut's question about colorism in bollywood)
कंगना रणौत प्रखर मत मांडणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने सध्या बॉलिवूडमध्ये होणार्या कलरिझमवर स्पष्टच बोलली. महाकुंभामध्ये फेमस झालेली मोनालिसा सावळी आहे. त्या आधारावर कंगनाने मोनालीसाचे कौतुक करून तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर असे लिहिले आहे की, 'मोनालिसा तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध झाली आहे. पण मला असा प्रश्न पडतो, बॉलिवूडमध्ये अशा सावळ्या रंगाच्या अभिनेत्री फारच कमी का आहेत? ज्या प्रकारे लोकांनी काजोल, राणी, बिपाशा, दीपिका यांना प्रेम दिलं, ते प्रेम नव्या सावळ्या तरुण अभिनेत्रींना मिळेल का?
बॉलिवूड विश्वाच्या अनुसार नैसर्गिक सौंदर्याला महत्त्व नाही. सुंदर म्हणजे गोरं. अशी सौंदर्याची व्याख्या झाली आहे. मुलीही या बॉलिवूडच्या जाळ्यात अडकून स्वत:ची त्वचा गोरी करण्याच्या प्रयत्नात स्वत:ची वाट लावून घेतात. रंग आणि सौंदर्य दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. सावळ्या मुलीही सुंदरच असतात. गोरं, सावळं, काळे असे वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. रंग बदलणे ना स्वभावाला चांगले ना त्वचेसाठी. मुलींनी स्वत:च्या नैसर्गिक ठेवणीवर प्रेम करायला शिकायला हवं.