तुमचे इस्टाग्राम फिडही सध्या कार्तिक आर्यनच्या फोटोनेच भरले आहे का? सध्या बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन याच्या गोवा ट्रिपची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.(I don’t know Kartik! Who is ‘that’ girl who says Kartik Aaryan is not her boyfriend? social viral ) नवीन चित्रपट किंवा कामामुळे नव्हे, तर त्याच्या खाजगी आयुष्याबद्दलची चर्चा सुरु आहे. नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये कार्तिकने गोव्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि यानंतरच या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली.
कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या गोव्यातील फोटोमध्ये समुद्रकिनारा, रिसॉर्ट आणि सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे क्षण दिसत होते. हे फोटो पाहताच चाहत्यांनी त्यावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या. मात्र काही दिवसांतच सोशल मीडियावर आणि विशेषतः Reddit सारख्या प्लॅटफॉर्मवर एक वेगळीच चर्चा सुरू झाली. काही युजर्सनी असा दावा केला की कार्तिक ज्या ठिकाणी गोव्यात सुट्ट्या घालवत होता, त्याच ठिकाणावरिन एका ‘मिस्ट्री गर्ल’नेही फोटो शेअर केले आहेत. फोटोमधील पार्श्वभूमी, बीच, हॉटेल, वेळा आणि जागा यामध्ये साम्य असल्याचे सांगत ते दोघे एकत्रच गोव्यात असल्याचा अंदाज बांधण्यात आला.
या चर्चेनंतर त्या मुलीचे नाव Karina Kubiliute असल्याचे समोर आले. कार्तिकसोबत तिचे नाव जोडले जाताच ती अचानक चर्चेत आली आणि तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली. काही तासांतच ती ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली आणि बॉलीवूड गॉसिप पेजेसवर तिचे फोटो फिरु लागले. कार्तिक आणि तिच्या चॅट्सचे फोटोही सोशल मिडियावर दिसतात मात्र ते खरे का खोटे सांगत येत नाही. कोणतीही अधिकृत माहिती त्याबद्दल उपलब्ध नाही.
या सर्व चर्चांनंतर भरपूर मिम्स आणि रिल्स व्हायरल झाले मग त्या मुलीने स्वतः प्रतिक्रिया दिली. तिने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये स्पष्ट शब्दांत लिहिले की 'I don’t know Kartik', म्हणजेच ती कार्तिक आर्यनला ओळखत नाही. काही माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तिने हेही सांगितले की तिचे नाव अभिनेता कार्तिक आर्यनसोबत जोडले जाणे चुकीचे असून ती त्याची गर्लफ्रेंड नाही. या स्पष्टीकरणामुळे डेटिंगच्या चर्चेला काही प्रमाणात विराम मिळाला.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात आणखी एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे सोशल मीडिया हालचाली. कार्तिक करिनाला इंस्टाग्रामवर फॉलो करत होता. काही रिपोर्ट्सनुसार कार्तिक आणि करिना यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे सांगितले जाते. यामुळे अफवा आणखी चिघळल्या, मात्र यावर कार्तिक किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही अधिकृत विधान देण्यात आलेले नाही. एकूणच पाहता, कार्तिक आर्यनची गोवा ट्रिप ही वैयक्तिक सुट्टी असताना सोशल मीडियामुळे ती वेगळाच विषय झाली. करिनाच्या स्पष्ट नकारानंतरही सोशल मीडियावर चर्चा काही थांबलेली नाही.
