Join us

'धर्मेंद्र तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही', डिंपल कपाडियांनी हेमा मालिनींना स्पष्ट सांगितलेलं; म्हणाल्या, 'तू विचार..'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2025 11:13 IST

Dharmendra health update: Dharmendra Hema Malini story: धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं नातं... अनेक वाद, अडथळे, टीका, गैरसमज आणि भावनिक वळणांनी भरलेली त्याची प्रेमकहाणी.

मागील काही आठवड्यांपासून बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.(Dharmendra health update) तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू आहेत. चाहते, सहकलाकार आणि सिनेसृष्टीतील अनेकांनी ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना देखील करत आहेत.(Bollywood relationship news)या संपूर्ण प्रसंगात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याशी संबंधित अनेक जुन्या आठवणी, किस्से आणि चर्चा पुन्हा एकदा समोर येताना दिसताय.(Dharmendra marriage controversy) त्यांच्या वैयक्तिक आयुष्याभोवतीचे अनेक गूढ पैलू आणि भावनिक गोष्टी नव्याने चर्चेत येऊ लागल्या आहेत.(Dharmendra Hema Malini story)

रात्रीच्या जेवणात चपाती की भात काय खावे? वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट पदार्थ, डॉक्टर म्हणतात..

बॉलीवूडच्या या झगमगत्या दुनियेमागे भावना, संघर्ष आणि किती गुंतागुंतीची नाती लपलेली असतात हे क्वचितच लोकांना माहित असते. सिनेमात दिसणार्‍या प्रेमकथा सरळसोट असतात. पण खऱ्या आयुष्यात नात्यांची गणितं कुणालाच सहज समजून येत नाहीत. त्यातीलच एक धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं नातं... अनेक वाद, अडथळे, टीका, गैरसमज आणि भावनिक वळणांनी भरलेली त्याची प्रेमकहाणी.

या नात्याविषयी अनेक अफवा पसरवल्या गेल्या पण त्यातील चर्चेचा विषय ठरला तो डिंपल कपाडिया आणि हेमा मालिनी यांच्या संवादातील. राम कमल मुखर्जी यांनी हेमा मालिनी यांचे आत्मचरित्र लिहिले. हेमा मालिनी : बियॉन्ड द ड्रीम गर्ल. यादरम्यान राजेश खन्ना यांच्या पत्नी डिंपल कपाडिया यांच्याशी हेमा मालिनी यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. या दरम्यान डिंपल कपाडिया यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की धर्मेंद्र तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही.. तू नीट विचार कर. 

डिंपल कपाडिया यांना माहित होतं की धर्मेंद्र आधीपासून विवाहित होते, त्यांचं कौटुंबिक आयुष्य गुंतागुंतीचं होतं आणि त्यात हेमा मालिनीचं प्रवेश करणं सोपं नसणार. म्हणूनच त्यांनी आपल्या मैत्रिणीली मनापासून सल्ला दिला होता “तू विचार कर.." १९८० साली धर्मेंद्र ह्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. त्यानंतर डिंपल कपाडिया म्हणालेल्या मला वाटलं नव्हते की, धर्मेंद्र हेमाशी लग्न करतील. मी तिला सांगितले होते की, हा माणूस तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. तू विचार केला पाहिजे. पण आजही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं नातं तितकंच मजबूत, जिव्हाळ्याचं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dimple Kapadia warned Hema Malini: Dharmendra will never marry you.

Web Summary : Amid Dharmendra's health concerns, old stories resurface. Dimple Kapadia cautioned Hema Malini about marrying Dharmendra due to his existing marriage. Despite the warning, they married in 1980 and share strong bond.
टॅग्स :सेलिब्रिटीधमेंद्रहेमा मालिनीरिलेशनशिप