Lokmat Sakhi >Celebrity Corner > मेरे बेटे मुझसे पूछते हैं के हमें पैदा क्यों किया था?- बाबूजींची कविता वाचून जेव्हा अमिताभ बच्चन रडले..

मेरे बेटे मुझसे पूछते हैं के हमें पैदा क्यों किया था?- बाबूजींची कविता वाचून जेव्हा अमिताभ बच्चन रडले..

Amitabh Bacchan's core memory about father, best poet Harivansh Rai Bachhan, When Amitabh Bachchan cried after reading Babuji's poem :तुम, अपने बेटे को उससे पूछ कर पैदा करना!- बाबूजींची ही कविता वाचून कुणाही बापलेकानं शिकावा आदराचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 15:59 IST2025-07-23T15:56:16+5:302025-07-23T15:59:47+5:30

Amitabh Bacchan's core memory about father, best poet Harivansh Rai Bachhan, When Amitabh Bachchan cried after reading Babuji's poem :तुम, अपने बेटे को उससे पूछ कर पैदा करना!- बाबूजींची ही कविता वाचून कुणाही बापलेकानं शिकावा आदराचा धडा

Amitabh Bacchan's core memory about father, best poet Harivansh Rai Bachhan, When Amitabh Bachchan cried after reading Babuji's poem | मेरे बेटे मुझसे पूछते हैं के हमें पैदा क्यों किया था?- बाबूजींची कविता वाचून जेव्हा अमिताभ बच्चन रडले..

मेरे बेटे मुझसे पूछते हैं के हमें पैदा क्यों किया था?- बाबूजींची कविता वाचून जेव्हा अमिताभ बच्चन रडले..

अमिताभ बच्चन आता आजोबा झालेले आहेत, जगण्याचे उन्हाळे हिवाळे पाहिले. आता नातवंड मोठी झाली. (Amitabh Bacchan's core memory about father, best poet Harivansh Rai Bachhan,  When Amitabh Bachchan cried after reading Babuji's poem)पण ते सांगतात एक आठवण आपली आणि वडिलांची. कधीतरी उर्मटासारखं वडिलांशी बोलल्यावर त्यांनी न बोलता कान कसा धरला आणि कसा त्यातून ते आदर आणि सन्मान करणं शिकले याची ही गोष्ट!


कौन बनेगा करोडपतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता. ते म्हणतात, कोणाला विचारुन मला जन्माला घातलं? हा प्रश्न जवळपास सगळीच मुलं आपल्या आईवडिलांना विचारतात. त्यांच्यावर चिडतात, दुरुत्तरं करतात. एकदा मी ही बाबूजींना विचारलं होतं की, जन्माला का घातलं मला? चिडलो आणि रागातच नंतर झोपून गेलो. त्यांनी त्यावेळी या प्रश्नाचं काहीही उत्तर दिलं नाही. पण एक कवितेची चिठ्ठी उशाशी ठेवली. आजही ती कविता माझ्याकडे मी जपून ठेवली आहे.’
अमिताभ यांचे वडील म्हणजे सुप्रसिध्द कवी हरिवंशराय बच्चन. त्यांच्या अनेक कविता गाजल्या आहेत. मुलाच्या अशा प्रश्नाचे उत्तर एक कवी ज्या पद्धतीने देईल तसेच उत्तर हरिवंशराय यांनी दिले. त्यांनी लिहीलेली कविता वाचून नंतर आयुष्यात परत अमिताभ यांनी वडिलांवर आवाज चढवला नाही. 

ती कविता वाचा..

जिंदगी और जमाने की कशमकश से घबराकर  
मेरे बेटे मुझसे पूछते हैं के हमें पैदा क्यों किया था?  
और मेरे पास इसके सिवाय कोई जवाब नहीं है  
कि मेरे बाप ने भी बिना पूछे मुझे पैदा किया था  
और मेरे बाप के बाप ने बिना पूछे उन्हें

ज़िंदगी और ज़माने की कशमकश  
पहले भी थी, अब भी है शायद ज्यादा,  
आगे भी होगी शायद और ज्यादा।  
तुम ही नई लीक धरना,  
अपने बेटे को उससे पूछ कर पैदा करना।


 
नई लीक या नावाने ही कविता ओळखली गेली. मात्र मुळात ती अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिहिली होती. प्रत्येक मुलामुलीने वाचावी आणि लक्षात ठेवावी अशी ही कविता!

Web Title: Amitabh Bacchan's core memory about father, best poet Harivansh Rai Bachhan, When Amitabh Bachchan cried after reading Babuji's poem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.