Lokmat Sakhi >Celebrity Corner > आमिर खानचा भाऊ फैजल खानला नेमका कोणता मानसिक आजार? त्याचा आरोप, घरात कोंडून ठेवलं आणि..

आमिर खानचा भाऊ फैजल खानला नेमका कोणता मानसिक आजार? त्याचा आरोप, घरात कोंडून ठेवलं आणि..

Aamir Khan brother news : Faisal Khan schizophrenia: Bollywood celebrity controversy : आमीर खानचा भाऊ फैजल खानला स्क्रिझोफेनियाचा त्रास, कुटूंबानं कळवून सांगितलं वेदना समजून घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2025 14:28 IST2025-08-11T14:23:41+5:302025-08-11T14:28:16+5:30

Aamir Khan brother news : Faisal Khan schizophrenia: Bollywood celebrity controversy : आमीर खानचा भाऊ फैजल खानला स्क्रिझोफेनियाचा त्रास, कुटूंबानं कळवून सांगितलं वेदना समजून घ्या..

Aamir Khan’s brother Faisal Khan on schizophrenia mental health Faisal Khan opens up about schizophrenia and family issues | आमिर खानचा भाऊ फैजल खानला नेमका कोणता मानसिक आजार? त्याचा आरोप, घरात कोंडून ठेवलं आणि..

आमिर खानचा भाऊ फैजल खानला नेमका कोणता मानसिक आजार? त्याचा आरोप, घरात कोंडून ठेवलं आणि..

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि त्याचा भाऊ फैजल खान यांचं नातं गेली अनेक वर्षे बरं नाही.(Aamir Khan brother news) अलिकडेच फैजल खानने असा आरोप केला होता की आमीरने त्याला एक वर्षभर एका खोलीत कोंडून ठेवलं होतं.(Faisal Khan schizophrenia) त्यानंतर आमिर खान आणि कुटूंबाने एक निवेदन प्रसिद्धीस दिलं की त्याच्या उपचारांसाठी जे निर्णय घेतले गेले ते साऱ्या कुटूंबाने एकत्रित घेतले. पण मुळात फैजल खानला नेमका आजार काय झाला होता? (Bollywood celebrity controversy)

फैजल खाननेच एका मुलाखतीत सांगितलं की, त्याला स्किझोफ्रेनियाचा त्रास आहे. पण आपल्याला हा मानसिक आजार असल्याने आमिर खानने वर्षभर घरात कोंडून ठेवले होते. मी समाजाला हानी पोहोचवू शकतो असं सांगण्यात आलं. स्क्रिझोफेनिक म्हणून चिडवण्यात आलं. पण मुळात स्क्रिझोफेनिया त्रास असतो काय?

ऐन तारुण्यात केस पिकले- कोंडा झाला? तेलात मिसळा पांढरा पदार्थ, पांढरे केस होतील काळे-टाळूही होईल स्वच्छ

स्क्रिझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार असून कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. या आजारामध्ये रुग्णाला अनेक भास होतात. त्याला सतत आपल्या आजूबाजूला कुणीतरी आहे असं वाटू लागतं. त्यांच्या या भावना अधिक तीव्र होत जातात. आपल्यावर कोणीतरी सतत नजर ठेवून आहे, आपल्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न होत आहे असं त्या रुग्णाला वारंवार वाटतं राहतं. हा आजार बरा होत नाही, पण मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने या आजारावर मात करता येते. उत्तम आयुष्य जगताही येऊ शकतं.

स्क्रिझोफेनियाची लक्षणं

झोप न लागणे, चित्रविचित्र भास होणे, सतत मूड स्विंग्स, चिडचिड होणे, सतत एकटेपणा जाणवणे, इतरांपासून लांब राहणे यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. यात असे रुग्ण स्वत:चे आभासी जग तयार करतात. 

स्क्रिझोफेनिया होण्याची कारणं

हा आजार अनुवांशिक असू शकतो, काहीवेळा तो सोशल डिसऑर्डरही असू शकतो. मेंदूत विशिष्ट बदल झाल्याने हा आजार होतो असं डॉक्टरांचं मत आहे. ड्रग्जच्या सेवनामुळे देखील हा आजार होतो. या आजारात रुग्णाला काम लक्षपूर्वक करता येत नाही. त्याच्या आकलनशक्तीवर परिणाम होतो. यावर वेळीच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Aamir Khan’s brother Faisal Khan on schizophrenia mental health Faisal Khan opens up about schizophrenia and family issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.