केसांची चमक आणि ते मजबूत असणं हे केवळ आपण जी केसांची काळजी घेतो त्यावर अवलंबून नाही तर ते तुमच्या खाण्याच्या सवयींवर देखील आहे. जर तुमचे केस कमकुवत झाले असतील, कोरडे झाले असतील किंवा जास्त प्रमाणात गळत असतील तर ते तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असल्याचं लक्षण असू शकतं.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, डर्मेटोलॉजिस्ट आणि स्किनफिनिटी डर्माच्या संस्थापक डॉ. इप्सिता जोहरी म्हणतात की, केसांची रचना प्रामुख्याने केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेली असते. म्हणून, केसांसाठी संतुलित आणि पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. पोषणाच्या कमतरतेचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो, ज्यामुळे केस गळतात, तुटतात आणि कमकुवत होतात. तुमच्या आहारातील बिघाड केसांच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो हे जाणून घेऊया...
प्रोटीनची कमतरता
केसांसाठी प्रोटीन खूप महत्त्वाचं असतं कारण ते केराटिन तयार करण्यास मदत करतं. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात. यासाठी तुमच्या आहारात अंडी, मासे, दूध, डाळी, काजू यांचा समावेश करा.
आयर्न कमतरता
आयर्न केसांना ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. त्याच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. आयर्नसाठी हिरव्या पालेभाज्या, आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध फळे खा.
झिंकची कमतरता
झिंक केसांच्या आरोग्यास आणि टाळूचं संतुलन राखण्यास मदत करतं. झिंकची कमतरता दूर करण्यासाठी, तुमच्या आहारात भोपळ्याच्या बिया आणि काजूचा समावेश करा.
बायोटिनची कमतरता
केराटिनच्या निर्मितीमध्ये बायोटिन महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याच्या कमतरतेमुळे केस पातळ आणि कमकुवत होऊ शकतात. अंडी, बदाम, रताळं आणि केळी हे बायोटिनचे चांगले सोर्स आहेत.
व्हिटॅमिन डीची कमतरता
व्हिटॅमिन डी केसांच्या वाढीस उत्तेजन देतं. यासाठी दुग्धजन्य पदार्थ खा.
व्हिटॅमिन सीची कमतरता
व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करतं. त्याच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होऊ शकतात. तुमच्या आहारात आंबट फळं, स्ट्रॉबेरी, शिमला मिरची आणि पेरू यांचा समावेश करा.