Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुरकुत्या डलनेसची समस्या नेहमीसाठी होईल दूर, घरीच तयार करा 'हे' ४ नॅचरल फेस सीरम...पार्लरसारखा मिळेल ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:35 IST

Homemade Face Serum : धूळ, माती, स्ट्रेबस, कमी झोप आणि अनहेल्दी फूड याचा प्रभाव सगळ्यात आधी चेहऱ्यावर दिसू लागतो. अशात काही घरगुती सीरमचा वापर करून त्वचा उजळ आणि हेल्दी ठेवू शकता.

Homemade Face Serum : हल्ली प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला त्वचेसंबंधी काहीना काही समस्या असतेच. मग त्या महिला असो वा पुरूष. सध्याच्या धावपळीच्या जीवनात त्वचेची योग्य ती काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. धूळ, माती, स्ट्रेबस, कमी झोप आणि अनहेल्दी फूड याचा प्रभाव सगळ्यात आधी चेहऱ्यावर दिसू लागतो. हळूहळू चेहऱ्याची चमक कमी होते आणि सुरकुत्या, डलनेस आणि पिगमेंटेशनसारख्या समस्या दिसू लागतात.  

वेळेआधी म्हातारं दिसावं असं कुणालाही वाटणार नाही. अशात आपल्या चेहऱ्या वाढत्या सुरकुत्या गायब करण्यासाठी बरेच लोक महागडे सीरम आणि ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. पण यातील केमिकल सगळ्यांनाच सूट होईल असं नाही. जर आपणही त्यांच्यापैकी एक असाल तर घरीच फेस सीरम आरामात तयार करू शकता. चला तर पाहुयात त्वचेसाठी घरीच हेल्दी आणि नॅचरल फेस सीरम कसे तयार कराल.  

मध आणि लिंबाचं सीरम 

जर आपली त्वचा फार जास्त डल झाली असेल आणि आपल्याला इंस्टेंट ग्लो हवा असेल तर मध आणि लिंबाचं सीरम ट्राय करू शकता. मधाने त्वचेला ओलावा मिळतो, तर लिंबाने त्वचेचा रंग उजळतो. हे सीरम बनवण्यासाठी २ चमचे मध घ्या, त्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. हे सीरम चेहऱ्या हलक्या लेअरमध्ये लावून २० मिनिटे तसंच ठेवा. जेव्हा हे सुकेल तेव्हा चेहरा कोमट पाण्याने धुवा. याने डल त्वचेवर चमक येईल आणि सुरकुत्याही कमी दिसतील.   

हळद आणि खोबऱ्याचं तेल  

जर आपली त्वचा निर्जीव दिसत असेल तर हळद आणि खोबऱ्याचं तेल आपल्यासाठी वरदान ठरू शकतं.  हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुण असतात आणि खोबऱ्याच्या तेलाने त्वचा आतपर्यंत मॉइश्चराइज होते. हे सीरम तयार करण्यासाठी २ चमचे खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात दोन चिमुट हळद घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर हलकी मसाज करत लावा. साधारण २० ते २५ मिनिटांनी चेहरा धुवा. याने त्वचा मुलायम होईल आणि हेल्दी ग्लो सुद्धा दिसेल. 

अॅलोव्हेरा सीरम  

जर आपल्याला त्वचेवर रोज लावण्यासाठी काही हवं असेल तर अॅलोव्हेरा सीरम बेस्ट पर्याय असेल. अॅलोव्हेराने त्वचेला थंडावा मिळण्यासोबतच त्वचा रिपेअरही होते. यासाठी १ चमचा अॅलोव्हेरा जेल, १ व्हिटामिन ई कॅप्सूल, १ चमचा गुलाबजल आणि अर्धा चमचा ग्लिसरीन मिक्स करा. हे मिश्रण एका स्वच्छ काचेच्या बॉटलमध्ये जमा करा. हे मिश्रण रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा आणि सकाळी चेहरा धुवा. याने ड्रायनेस, पिंपल्स आणि फाइन लाइन्सपासून सुटका मिळेल.  

दालचीनी आणि मध 

जर आपल्या चेहऱ्यावर फार जास्त पिंपल्स येत असतील तर दालचीनी आणि मधाचं सीरम प्रभावी ठरू शकतं. यासाठी १ चमचा मध घ्या आणि एक छोटा चमचा दालचीनी पूड मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. याने पिंपल्स कमी होतील आणि त्वचा खोलवर साफ होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Natural face serums for glowing skin and wrinkle reduction at home.

Web Summary : Combat dullness and wrinkles with homemade face serums. Honey-lemon brightens; turmeric-coconut oil moisturizes. Aloe vera soothes daily, while cinnamon-honey fights pimples, revealing radiant, healthy skin.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स