Join us
Daily Top 2Weekly Top 5

Winter skincare : थंडीत प्या गरमागरम कॉफी आणि चेहऱ्यालाही लावा, हिवाळ्यात चेहरा मऊ तुकतुकीत ठेवण्याचा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2025 14:39 IST

Winter skincare: Drink coffee and apply it to your face as well, an easy solution to keep your face soft and beautiful in winter : हिवाळ्यात चेहरा सुंदर ठेवण्यासाठी करा सोपे उपाय. पाहा कॉफीचा मास्क लावायची पद्धत.

थकवा येणे, चेहरा डल दिसणे किंवा पोर्स मोठे दिसणे या सगळ्याच समस्या आजकाल सामान्य झाल्या आहेत. प्रदूषण, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि अनियमित आहार यामुळे चेहर्‍याची चमक कमी होते. (Winter skincare: Drink coffee and apply it to your face as well, an easy solution to keep your face soft and beautiful in winter)अशावेळी घरच्या घरी तयार होणारे नैसर्गिक मास्क वापरणे फायद्याचे ठरते. त्या पैकीच एक मस्त मास्क म्हणजे कॉफी मास्क. हा मास्क त्वचेला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी उत्तम ठरतो. कॉफीतील अँटी ऑक्सिडंट्स त्वचेला आतून रिफ्रेश करतात.

कॉफी मास्क करण्यासाठी फार काही विशेष साहित्य लागत नाही. एक टेबलस्पून कॉफी पावडर, तितकेच दही आणि एक चमचाभर मध एकत्र मिसळले की हा नैसर्गिक मास्क तयार होतो. हा मास्क चेहर्‍यावर लावणे फारच फायद्याचे ठरते. फक्त चेहरा स्वच्छ धुतल्यानंतरच मास्क लावावा आणि सुमारे वीस मिनिटे सुकू द्यायचा. नंतर हलक्या हाताने मसाज करत कोमट पाण्याने धुतल्यावर त्वचा लगेचच तजेलदार दिसू लागते.

या मास्कचे सौंदर्य वाढवणारे गुण खरोखर उल्लेखनीय आहेत. कॉफी त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसतो. तिच्यातील कॅफीन ओपन पोर्स घट्ट करते आणि सूज कमी करण्यास मदत करते. त्यामुळे डोळ्यांखालचा पफीनेसही कमी होतो. कॉफीचा सौम्य एक्सफोलिएटिंग प्रभाव टॅन आणि पिग्मेंटेशन कमी करण्यात मदत करतो, तर मध चेहऱ्याला मऊपणा देतो. दह्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचा उजळवण्यास आणि डलनेस दूर करण्यास सहाय्यक ठरते.

आठवड्यातून दोन वेळा हा मास्क वापरल्यास त्वचेचा टोन सुधारतो, रंध्रे स्वच्छ राहतात आणि त्वचा नैसर्गिकरीत्या चमकू लागते. मात्र अतिसंवेदनशील त्वचा असलेल्यांनी मास्क वापरण्याआधी पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे. मास्क डोळ्यांच्या अगदी जवळ लावू नये आणि त्वचा आधीच कोरडी असेल तर कॉफीचे प्रमाण थोडे कमी ठेवावे.

नैसर्गिक उपायांवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी कॉफी मास्क एक सुंदर, सोपा आणि प्रभावी पर्याय आहे. घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारा हा मास्क त्वचेला तजेला देतो आणि रोजच्या थकव्यातून त्वरित आराम मिळवून देतो. नियमित वापराने त्वचा अधिक स्वच्छ, तजेलदार आणि आकर्षक होते. तेही कोणत्याही रासायनिक उत्पादकांशिवाय.

English
हिंदी सारांश
Web Title : Coffee face mask: Simple winter skincare for soft, glowing skin.

Web Summary : Rejuvenate winter skin with a homemade coffee mask. Coffee's antioxidants refresh, improving circulation and reducing puffiness. Mix coffee, yogurt, and honey; apply for 20 minutes for a radiant, soft complexion. Use twice weekly for best results.
टॅग्स :त्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडीहेल्थ टिप्स