Aloe Vera Benefits for Face in Winter : कोरफडीच्या गरामध्ये अनेक पोषक तत्व असतात. हे केवळ आरोग्यासाठीच नाहीतर त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. कोरफडीचा गर त्वचेवर लावल्यानं त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. यात भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. कोरफडीच्या गरानं त्वचा मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेट राहते.
नुकतीच थंडीला सुरूवात झाली आहे. या दिवसांमधील कोरडी व थंड हवा त्वचा ड्राय करते, ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि खडबडीत दिसते. अशावेळी कोरफडीचा गर त्वचेवर लावणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तुम्ही हिवाळ्यात चेहऱ्यावर कोरफडीचा गर वापरू शकता. चला जाणून घेऊया हिवाळ्यात कोरफडीच्या गराचा वापर कसा करावा.
हिवाळ्यात कोरफडीच्या गरात काय मिसळून लावावे?
हिवाळ्यात आपण कोरफडीच्या गरामध्ये गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावू शकतो. कोरफडीनं त्वचा मॉइश्चरायझ राहते, तर गुलाबजल त्वचेला हायड्रेट ठेवतं. दोन्ही मिळून त्वचा मुलायम, फ्रेश आणि सतेज दिसते.
हिवाळ्यात कोरफडीचा गर लावण्याचे फायदे
हिवाळ्यात त्वचा खूप ड्राय होते. कोरफडीच्या गरानं त्वचेतील ओलावा कायम राहतो. यानं त्वचा मऊ आणि चमकदार बनते. तसेच यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुण त्वचेची सूज, जळजळ आणि लालसरपणा कमी करतात. तसेच डाग-चट्टे, पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवतात. कोरफडीच्या गरानं डेड स्किन निघून जाते आणि त्वचा ताजी दिसते. त्यामुळे थंडीच्या दिवसात नियमितपणे त्वचेवर कोरफडीचा गर लावावा.
