Winter Skin Care Tips : थंडीच्या दिवसातील गार वाऱ्यामुळे त्वचेवर कोरड पडते. त्यामुळे अनेकांना त्वचेवर खाजही येते. डोक्यासोबतच हिवाळ्यात हात, पाय, मान किंवा शरीरावर खाज येते. एकदा खाजवल्यावर आराम तर मिळतो, पण नंतर त्या जागेवर जास्त खाज येऊ लागते आणि त्याची जखम तयार होते. कधी कधी इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो. पण शरीराच्या वेगवेगळ्या भागात एकत्र खाज येत असेल तर ही समस्या दूर करणे जरा कठीण असतं. पण काही खास उपाय केले तर खाज दूर केली जाऊ शकते.
मोहरीचं तेल
हिवाळ्यात खाज येण्याचं मुख्य कारण त्वचा कोरडी होणं हे आहे आणि हा त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मोहरीचं तेल चांगला पर्याय आहे. फार पूर्वीपासून आपले पूर्वज आंघोळ करण्याआधी शरीराला मोहरीचं तेल लावत असत. याने त्वचा मुलायम होत असे. मोहरीचं तेल त्वचेच्या आत गेल्यावर त्याने त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा मुलायम होते. खाजवणे दूर करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
कडूलिंब
कडूलिंबाला त्वचेसाठी गोड मानलं जातं. कडूलिंब हा त्वचेसाठी फार फायदेशीर असतो. कारण या झाडाच्या पानांमध्ये अॅंटी-सेप्टिक आणि अॅंटी-बायोटिक गुण असतात. जे खाज दूर करण्यासाठी फायदेशीर असतात. यासाठी कडूलिंबाची पाने पाण्यात उकळून घ्या आणि हे पाणी कोमट झाल्यावर त्याने आंघोळ करा. किंवा ही पाने बारीक करुन दह्यासोबत खाज येणाऱ्या जागेवर लावून ठेवा. यानेही खाज दूर होते.
लिंबू
खाज दूर करण्यासाठी सर्वाच चांगला घरगुती उपाय म्हणजे लिंबू. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लिंबू घरात सहज मिळतं. लिंबामध्ये अॅसिडिक आणि सिट्रिक अॅसिड असतं. याने खाजवण्याची समस्या दूर करण्यास मदत मिळते. हा उपाय करण्यासाठी लिंबाचा रस पाण्यात टाका आणि खाज येणाऱ्या जागेवर लावा. याने थोडी जळजळ होईल. पण आराम मिळेल. तसेच दोन चमचे तुळशीच्या पानांचा रस आणि दोन चमचे लिंबाचा रस मिश्रित करुन खाज येत असलेल्या जागेवर लावा. याने खाज दूर होईल.
झेंडूच्या रोपाची पाने
झेंडूच्या रोपाच्या पानांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी वायरल आणि अॅंटी फंगल गुण असतात. याने तुमची खाजवण्याची समस्या दूर होते. यासाठी तुम्हाला झेंडूच्या झाडाची काही पाने पाण्यात टाकून उकळून घ्या. नंतर हे पाणी खाज येत असलेल्या जागेवर लावा. जर हा उपाय ७ दिवस केला गेला तर तुमची समस्या दूर होईल.
Web Summary : Winter dryness causes itching? Mustard oil, neem, lemon, and marigold leaves provide relief. These remedies nourish, offer antiseptic properties, and soothe irritated skin effectively, promoting softer skin.
Web Summary : सर्दी में खुजली का कारण सूखापन है? सरसों का तेल, नीम, नींबू और गेंदे के पत्ते राहत देते हैं। ये उपाय पोषण देते हैं, एंटीसेप्टिक गुण प्रदान करते हैं, और त्वचा को आराम पहुंचाते हैं।