lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > स्पॉटलेस, तुकतुकीत, चकाकणारी त्वचा हवी? आठवड्यातून फक्त एकदा करा 'या' तेलाचा मस्त मसाज..

स्पॉटलेस, तुकतुकीत, चकाकणारी त्वचा हवी? आठवड्यातून फक्त एकदा करा 'या' तेलाचा मस्त मसाज..

Winter care: थंडी सुरू होताच अंग फुटू लागलं ना... म्हणूनच तर कोरड्या, निस्तेज झालेल्या त्वचेला पुन्हा एकदा तुकतुकीत आणि चमकदार बनविण्यासाठी करून बघा हा सोपा उपाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 04:04 PM2021-11-17T16:04:00+5:302021-11-17T16:05:06+5:30

Winter care: थंडी सुरू होताच अंग फुटू लागलं ना... म्हणूनच तर कोरड्या, निस्तेज झालेल्या त्वचेला पुन्हा एकदा तुकतुकीत आणि चमकदार बनविण्यासाठी करून बघा हा सोपा उपाय !

Winter care: Need spotless, smooth, glowing skin? Just once a week do a body massage by sesame oil .. | स्पॉटलेस, तुकतुकीत, चकाकणारी त्वचा हवी? आठवड्यातून फक्त एकदा करा 'या' तेलाचा मस्त मसाज..

स्पॉटलेस, तुकतुकीत, चकाकणारी त्वचा हवी? आठवड्यातून फक्त एकदा करा 'या' तेलाचा मस्त मसाज..

Highlights मसाज करण्यासाठी योग्य तेल वापरल्या गेलं, तर नक्कीच त्वचेचे अधिक चांगल्याप्रकारे पोषण होते.

इतर कोणत्याही ऋतूत घ्यावी लागत नाही, एवढी आपल्या त्वचेची काळजी आपल्याला हिवाळ्यात घ्यावी लागते. कारण थंडी पडू लागताच अंग उलायला सुरुवात होते आणि त्वचा कोरडी पडते. रात्री झोपताना व्हॅसलिन, सकाळी उठल्यावर मॉईश्चरायझर असे सगळे उपाय करूनही हात, पाय काेरडेच दिसू लागतात. बऱ्याचदा तर असंही होतं की पाठ, पोठ, मांड्या, पोटऱ्या या भागातला कोरडेपणाही खूप जास्त वाढतो आणि त्यांना खाज येऊ लागते. डोक्यात ज्याप्रमाणे कोंडा होतो, तसाच कोंडा काही जणांना हिवाळ्यात अंगावरही जाणवायला लागतो. असा कोरडेपणा त्वचेचे खूपच जास्त नुकसान करणारा आहे. त्यामुळे अशा त्वचेची काळजी घेतलीच पाहिजे. 

 

त्वचेची काळजी घेण्यासाठी हिवाळ्यात संपूर्ण अंगाला मसाज करायला हवी, असं सांगितलं जातं. आयुर्वेदातही मसाज करण्याचा उपाय अतिशय चांगला मानला गेला आहे. यात जर मसाज करण्यासाठी योग्य तेल वापरल्या गेलं, तर नक्कीच त्वचेचे अधिक चांगल्याप्रकारे पोषण होते. म्हणूनच हिवाळ्यातही त्वचा कोरडी पडू नये, तजेलदार व्हावी आणि तुकतुकीत दिसावी यासाठी आठवड्यातून एकदा तिळाचे तेल वापरून संपूर्ण अंगाला मसाज करा. तिळाचे तेल उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात तिळाच्याच तेलाने मसाज करावी. कारण त्यामुळे त्वचेला अधिक फायदा होतो, असे सांगितले जाते. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात तिळाचे तेल वापरण्याचा आणि उन्हाळ्यात तिळाचे तेल न वापरण्याचा सल्ला दिला जातो. 

 

तिळाच्या तेलाने मसाज करण्याचे फायदे
१. आधी सांगितल्याप्रमाणे तिळाचे तेल उष्ण असते. त्यामुळे या तेलाने जर शरीराला मालिश केली तर शरीराला निश्चितच उब मिळते आणि थंडीचा त्रास होत नाही.
२. तिळाच्या तेलामुळे सांध्यांनाही चांगलाच आराम मिळतो. सांध्यांना उबदारपणा येतो. त्यामुळे हिवाळ्यात अधिक जाणवणारा सांधेदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
३. तिळाच्या तेलाची उष्णता शरीराला मिळताच, रक्तप्रवाह अधिक उत्तमप्रकारे होते. रक्ताभिसरण अधिक चांगले झाल्यामुळे त्वचेचा पोत नैसर्गिक पद्धतीने सुधारण्यास मदत होते.
४. तिळाच्या तेलाने केलेली नियमित मसाज आपल्याला सर्दी, खोकला, शिंका, नाक गळणे यासारख्या हिवाळी आजारांपासून दूर ठेवते.
५. इतर कोणत्याही तेलापेक्षा तिळाचं तेल आपली त्वचा अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेते. त्यामुळे हे तेल चांगल्याप्रकारे शरीरात मुरतं आणि त्वचेला तुकतुकीत करतं.
६. तिळाच्या तेलामध्ये खूप जास्त पोषणमुल्ये असतात.

७. सनस्क्रिन लोशनमध्ये त्वचेचे पोषण करणारे जे घटक असतात, ते घटक तिळाच्या तेलात नैसर्गिक स्वरूपात खूप अधिक प्रमाणात उपलब्ध असतात, असंही तिळाच्या तेलाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं.
८. तिळाच्य तेलाने नियमित मसाज केल्यास हाडांना मजबूती मिळते, हाडे बळकट होतात.
९. गर्भवती महिलेने गरोदरपणात तिळाच्या तेलाने नियमित मसाज केल्यास शरीरावर स्ट्रेचमार्क दिसत नाहीत.
१०. तिळाच्या तेलाने मसाज केल्यास पित्ताचा त्रासही कमी होतो. 

 

मसाज करताना अशी काळजी घ्या....
- तिळाचं तेल उष्ण असतं. त्यामुळे या तेलाने आठवड्यातून जास्तीत जास्त दोन वेळा मसाज करा.
- मसाज करण्यासाठी नेहमी कोमट तेल वापरावं.
- मसाज केल्यानंतर एक- दिड तास ते तेल अंगात मुरू द्या आणि त्यानंतरच आंघाेळ करा. पण त्या एक- दिड तासात कुठेही धुळीच्या ठिकाणी जाऊ नका. घरातल्या घरातही खूप जास्त फिरू नका.
- मसाज केल्यानंतर गरम पाण्यानेच आंघोळ करावी. 

 

Web Title: Winter care: Need spotless, smooth, glowing skin? Just once a week do a body massage by sesame oil ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.