Join us

त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं जोजोबा ऑइल, वाचा ३ मोठे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 20:03 IST

Jojoba oil : जोजोबा ऑइल त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. या ऑइलनं पिंपल्स दूर होतात आणि सुरकुत्याही नाहीशा होतात.

Jojoba oil : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, वेगवेगळे स्किन प्रोडक्ट्स जसे की, बॉडी लोशन, मॉइश्चरायजर किंवा फेस ऑइलच्या बॉटलवर त्यात काय काय आहे हे लिहिलेलं असतं. ज्यात तुम्ही कधीना कधी जोजोबा ऑइल लिहिलेलं वाचलं असेल. वेगवेगळ्या तेलांबाबत तुम्हाला माहीत असेल, पण जोजोबा ऑइल काय आहे हे माहीत नसेल. याबाबत प्रश्नही तुम्हाला पडला असेल. जोजोबा ऑइल त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. या ऑइलनं पिंपल्स दूर होतात आणि सुरकुत्याही नाहीशा होतात.

त्वचेसाठी जोजोबा ऑइल खूप फायदेशीर मानलं जातं. या तेलाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे ऑइल लाइट असतं. त्यामुळे स्किन पोर्स बंद न करता चांगल्या पद्धतीनं आतपर्यंत स्किनला मॉइश्चराइज करतं.

आतपर्यंत ओलावा

जोजोबाची संरचना खूप हलकी असते, त्यामुळे तेल त्वचेचे रोमछिद्र बंद न करता त्वचेच्या आतपर्यंत जातं आणि त्वचेला ओलावा देतं. ज्यामुळे ड्राय आणि संवेदनशील त्वचा चांगली होते. यात त्वचेला ओलावा देण्याची क्षमता अधिक असते.

सूज शांत होते

जोजोबा ऑइलमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व असतात. त्यामुळे या तेलात एक्झिमा आणि सोरायसिससारख्या त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. तुम्हाला जर कोणतीही मेडिकल कंडिशन असेल तर त्वचेसाठी जोजोबा ऑइलचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पिंपल्स दूर होतात

जोजोबा तेलात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल गुण असतात. हे तेल नॉन कॉमेडोजेनिक असल्यानं पिंपल्स न येऊ देता तुमचे रोमछिद्र साफ करण्यास मदत मिळते. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जोजोबा तेलाचं क्ले फेस मास्क हलके पिंपल्स दूर करण्यास मदत करतं.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स