Lokmat Sakhi >Beauty > दर महिन्यात का बिघडतं त्वचेचं आरोग्य? एक्सपर्टनी सांगितली कारणं आणि त्यावरील उपाय..

दर महिन्यात का बिघडतं त्वचेचं आरोग्य? एक्सपर्टनी सांगितली कारणं आणि त्यावरील उपाय..

Skin Care Tips : मासिक पाळीदरम्यान महिलांना त्वचेसंबंधी सुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ड्राय स्किनसोबत पिंपल्स येणं फार कॉमन आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:04 IST2025-06-21T11:03:03+5:302025-06-21T11:04:01+5:30

Skin Care Tips : मासिक पाळीदरम्यान महिलांना त्वचेसंबंधी सुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ड्राय स्किनसोबत पिंपल्स येणं फार कॉमन आहे.

Why does skin health deteriorate every month? Experts explain the reasons | दर महिन्यात का बिघडतं त्वचेचं आरोग्य? एक्सपर्टनी सांगितली कारणं आणि त्यावरील उपाय..

दर महिन्यात का बिघडतं त्वचेचं आरोग्य? एक्सपर्टनी सांगितली कारणं आणि त्यावरील उपाय..

Skin Care Tips : महिलांना दर महिन्यात मासिक पाळी येते. पाळी येण्याआधी शरीरात अनेक बदलही बघायला मिळतात. याला क्रॅम्प्स असंही म्हणतात. यादरम्यान पोटात वेदना, मूड स्विंग्स, चिडचिडपणा वाढतो. काही महिलांना यादरम्यान जास्त ब्लीडिंगही होतं. अशात कुणाचीही चिंता वाढणं स्वाभाविक आहे. 

मासिक पाळीदरम्यान महिलांना त्वचेसंबंधी सुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ड्राय स्किनसोबत पिंपल्स येणं फार कॉमन आहे. याचे कारण हार्मोन्समध्ये असंतुलन आहे. स्किन एक्सपर्ट डॉ. गीतिका मित्तल गुप्ता यांनी त्वचेसंबंधी या समस्या दूर करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. सोबतच या समस्या का होतात याचं कारणही सांगितलं आहे.

डॉक्टर सांगतात की, जर मासिक पाळीच्या प्रत्येक टप्प्यात गरजेनुसार त्वचेची काळजी घेतली तर बराच आराम मिळू शकतो. Menstrual Cycle चे 4 वेगवेगळे फेज आणि त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स जाणून घेऊ.

मेंस्ट्रुअल फेज (दिवस 1 ते 5 पर्यंत)

या फेजमध्ये शरीरात अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन्सचं प्रमाण खूप कमी होतं. ज्यामुळे त्वचा ड्राय होते आणि डल दिसू लागते. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही क्रीम बेस्ड जेंटल क्लींजरनं चेहरा साफ करू शकता. हायलूरोनिक अ‍ॅसिडसारखं हायड्रेटिंग सीरमही लावू शकता.

फॉलिक्युलर फेज (दिवस 6 ते 14 पर्यंत)

यादरम्यान अ‍ॅस्ट्रोजनची लेव्हल हळूहळू वाढू लागते, ज्यामुळे त्वचेवर ग्लो येऊ लागतो आणि चेहरा फ्रेश दिसतो. हा त्वचेसाठी सगळ्यात चांगला काळ असतो. अशात हलक्या स्क्रबनं एक्सफोलिएशन सुरू केलं पाहिजे. व्हिटामिन सी मुळे चेहऱ्यावर नॅचरल चमक येऊ शकते.

ओव्युलेशन फेज (दिवस 14 ते 17 पर्यंत)

यावेळी शरीराची एनर्जी आणि स्किनचा ग्लो आपल्या पीकवर असतो. पण सोबतच त्वचा जास्त तेलकटही होऊ शकते. त्वचा तेलकट होणं टाळण्यासाठी जेल बेस्ड फेसवॉशचा वापर करू शकता. तुम्ही क्ले मास्कही लावू शकता. 

ल्यूटल फेज (दिवस 18 ते 28 पर्यंत)

आता शरीरात प्रोजेस्ट्रोन हार्मोन वाढू लागतात, ज्यामुळे त्वचा आणखी तेलकट होते आणि पिंपल्सचा धोकाही वाढतो. चेहऱ्यावर पिंपल्स येऊ द्यायचे नसतील तर सॅलिसिलिक अ‍ॅसिड असलेलं फेसवॉश लावा. यानं त्वचा तेलकट होणार नाही. 

Web Title: Why does skin health deteriorate every month? Experts explain the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.