Scalp Itching Causes : हिवाळा असो किंवा उन्हाळा, वर्षात असा एक काळ नक्की येतो जेव्हा आपल्या डोक्याच्या त्वचेमध्ये खूपच खाज येते. सामान्यपणे कोंड्यामुळे डोक्यात खाज येत असते, पण कधी कधी कोंड्याशिवायही डोक्यात खाज येते. त्यामुळे लोक अधिकच घाबरतात. पण ही समस्या येते कशामुळे? जर तुम्हालाही अशीच अडचण असेल, तर काळजी करण्याची गरज नाही.
डर्मेटोलॉजिस्ट डॉ. गुरुवाणी रावू यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे डोक्याच्या त्वचेमध्ये खाज का होते आणि त्यावर कोणते उपाय करावेत हे सांगितले आहे. जाणून घेऊयात.
स्कॅल्पवर खाज होण्याचा अर्थ काय?
डॉ. रावू सांगतात की डोक्यात होणारी सततची खाज म्हणजे डँड्रफच असतो असं नाही. ही समस्या सेबोरिक डर्मेटायटिस, कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस किंवा सोरायसिसमुळेही होऊ शकते. जर तुम्ही वारंवार डोकं खाजवत असाल, तर तुमच्या स्कॅल्पचा बॅरियर कमजोर झाला आहे. फक्त अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरून ही समस्या सुधारत नाही.
डँड्रफशिवाय स्कॅल्पला खाज होण्याची ४ कारणं
प्रॉडक्ट बिल्डअप
ड्राय शाम्पू, तेल, हेअर जेल किंवा इतर स्टायलिंग प्रॉडक्ट्समुळे केसांच्या फॉलिकल्समध्ये ब्लॉकेज होतात. यामुळे स्कॅल्पमध्ये इरिटेशन होऊन खाज वाढते.
हार्ड वॉटर
हार्ड वॉटरमध्ये असलेले मिनरल डिपॉझिट्स स्कॅल्पमध्ये समस्या निर्माण करतात. यामुळे कोरडेपणा, खवले आणि सततची अस्वस्थता निर्माण होते.
घाम आणि प्रदूषण
भारतासारख्या हवामानात उष्णता, धूळ आणि प्रदूषणामुळे स्कॅल्प सहज इन्फ्लेम्ड होते. यामुळे खाज, लालसरपणा आणि सूज येऊ शकते.
अॅलर्जिक रिअॅक्शन
फ्रेग्रेन्स, हेअर डाई किंवा खूप स्ट्रॉंग शाम्पू यांमुळे स्कॅल्पला अॅलर्जी होऊन खाज येऊ शकते.
काय कराल उपाय?
डॉ. गुरुवाणी रावू यांनी दिलेले उपाय
- डोक्याची त्वचा साफ ठेवा, पण जास्त घासू नका
- जास्त घासल्याने स्कॅल्प बॅरियर आणखी खराब होतो.
- जेंटल, पीएच-बॅलन्स्ड शाम्पू वापरा. हार्श केमिकल्स असलेले शॅम्पू स्कॅल्पला आणखी इरिटेट करतात.
- तेल किंवा स्टायलिंग प्रॉडक्ट्सचा अतिवापर टाळा. जास्त तेल लावल्यानेही पोर्स ब्लॉक होतात.
- खाज कमी न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्कॅल्पही त्वचेचाच भाग आहे, त्यामुळे त्याचीदेखील योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
