Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावर खळी म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, पण खळी नेमकी पडते कशी? सगळ्यांना खळी का नसते..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:32 IST

Dimples interesting facts : काही लोकांच्याच गालांवर खळी कशी पडते? अर्थातच अनेकांना या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता असेल. तेच आपण जाणून घेऊया.

Dimples interesting facts : दोन्ही गालांच्या मधोमध पडणारा खड्डा म्हणजेच खळी ही सौंदर्याचं एक अद्भूत प्रतीक मानली जाते. याने चेहऱ्याच्या सुंदरतेत अधिक भर पडते, चेहरा अधिक आकर्षक दिसतो. खळी पडलेल्या चेहऱ्याच्या स्माइलने तर लोकांना भुरळ पाडली आहे. मग तो शाहरूख खान असो, दीपिका पादुकोन असो, आलिया भट्ट असो वा प्रीति झिंटा ते अलिकडची महाराष्ट्राची हास्यजत्रेतील प्रियदर्शिनी इंदलकर असो...यांच्या गालांवरील खळीने लोकांना वेड लावलं आहे. अनेकांची खासकरून तरूणींची अशी इच्छा असते की, आपल्याही गालावर खळी पडायला हवी. पण ही काही मागितली आणि मिळाली अशी गोष्ट नाही. पण मग प्रश्न असा उभा राहतो की, काही लोकांच्याच गालांवर खळी कशी पडते? अर्थातच अनेकांना या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता असेल. तेच आपण जाणून घेऊया.

गालावर खळी पडण्याचं कारण...

काही एक्सपर्टचं मत आहे की, गालांवर खळी पडण्याचं मुख्य कारण हे जेनेटिक असतं. तर काही म्हणतात की, जेनेटिक कारणाबाबत काही ठोस पुरावा नाही. म्हणजे खळी पडण्याचं कारण काहीतरी वेगळंही असू शकतं. यात तथ्यही आहे, कारण यासाठी एक खास स्नायू कारणीभूत असतो.

एक खास स्नायू आणि गालावर खळी

खळीबाबतच्या एका दुसऱ्या थेअरीनुसार, काही लोकांच्या गालांवर खळी पडते, यामागचं कारण त्यांच्या गालांवरील एक खास स्नायू जो इतरांच्या तुलनेत लहान असतो किंवा दोन भागात विभागला जातो. ज्यामुळे स्माइल केल्यावर गालांवर खड्डा पडतो. या स्नायूला 'जायगोमॅटिकस मेजर' असं म्हणतात.

जेव्हा आपण हसतो, तेव्हा चेहऱ्यावरील एक विशेष स्नायू आकुंचन पावते. हा स्नायू दोन भागांची असते. यातील एक भाग थेट त्वचेला जोडलेला असतो. त्यामुळे स्नायू आकुंचन पावल्यावर त्वचा आत ओढली जाते आणि त्या ठिकाणी एक लहानसा खड्डा किंवा खळी (डिंपल) तयार होते.

फोविया बुकॅलिस

डिंपलला म्हणजेच खळीला तांत्रिक भाषेत फोविया बुकॅलिस असे म्हणतात. भ्रूणाच्या विकासाच्या काळात चेहऱ्याच्या मांसपेशींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे डिंपल तयार होते. डिंपल असणे पूर्णपणे सामान्य आहे आणि त्याचा आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.

आधी दिसणारी नंतर गायबही होते

काही केसेमध्ये असंही बघायला मिळतं की, काही लोकांच्या गालावर बालपणी छान अशी खळी पडते. पण ते जसजसे मोठे होत जातात त्यांची ही गालावरची खळी नाहिशी होत जाते. याचं कारण आहे बालपणी लहान मुलांच्या गालांमधील बेबी फॅट. पण लहान मुलं मोठी होत असताना हे बेबी फॅट नष्ट होऊ लागतात. त्यामुळे खळीही नाहिशी होते.

फक्त गालावरच नसते खळी

अनेकांना असं वाटतं की, केवळ गालावरच खळी येते. हनुवटीवरही खळी येते. याचं कारण ना आनुवांशिक आहे ना स्नायू लहान असणं. हनुवटीवर खळी येते कारण जेव्हा बाळ आईच्या गर्भात वाढत असतं तेव्हा बाळाची उजव्या आणि डाव्या बाजूच्या हनुवटीचं हाड जुळत नाही, त्यामुळे हनुवटीवर खळी पडते.

English
हिंदी सारांश
Web Title : Dimples: The Science Behind Facial Indentations and Why Some Have Them

Web Summary : Dimples, often seen as beauty marks, result from genetics or a unique facial muscle. The zygomaticus major muscle, if shorter or divided, causes the skin to indent upon smiling. Dimples can fade with age as baby fat disappears. Chin dimples form due to incomplete fusion of the jawbone during fetal development.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी