आजकालच्या जीवनशैलीत केस गळणं, केस पांढरे होणं या समस्या खूपच कॉमन झाल्या आहेत. प्रदूषण, ताण-तणाव, असंतुलित आहार आणि केमिकल्सयुक्त उत्पादनं यामुळे केस कमकुवत होतात. काही घरगुती, आयुर्वेदीक उपाय करून तुम्ही केस लांबसडक बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्वंदाचा वापर करावा लागेल. जास्वंद आणि मेथीत काही पोषक तत्व असतात जे केसांना मुळांपासून पोषण देतात आणि नवीन केस उगवण्यात मदत करतात, ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. (Which oil makes hair grow faster)
जास्वंदाच्या फुलात आणि पानांमध्ये व्हिटामीन सी, अमिओ एसिड, एंटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. ज्यामुळे केस आतून मजबूत होतात. जास्वंदातील अमिनो एसिड केराटिन प्रोटीन वाढवते आणि केस तुटणं थांबवते आणि केस मुळांपासून मजबूत होतात.
फक्त १० दिवस १० गोष्टी करा, झरझर घटेल वजन-दिवाळीत सुडौल, बारीक दिसाल
जास्वंदाच्या फुलामुळे केस मऊ, मुलायम राहतात याशिवाय केसांचा कोरडेपणाही कमी होतो. जास्वंद स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवते. ज्यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते. याचे एंटीफंगल गुण डोक्यातील खाज, कोंडा दूर करते आणि स्काल्प निरोगी ठेवतो.
मेथीच्या दाण्यांचे फायदे
मेथीचे दाणे प्रोटीन, आयर्न, लेसिथिन आणि निकोटिनिक एसिडचा चांगला स्त्रोत आहेत. जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. मेथीतील आवश्यक पोषक तत्व केसांच्या फॉलिकल्सना मजबूत करतात ज्यामुळे केस गळणं कमी होतं. लेसिथिन स्काल्पला पोषण देते आणि डॅमेज बरे करता येते आणि केस दाट राहतात. मेथीमुळे केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते आणि केस मऊ, मुलायम राहतात.
आलिया भटचा आवडता पदार्थ असलेला दही भात रोज खाण्याचे ५ फायदे-पाहा सोपी रेसिपी
आठवड्यातून २ वेळा या मेथीच्या किंवा जास्वंदाच्या तेलानं मालिश करा. तेल कमीत कमी १ तास तसंच लावलेलं राहू द्या. सकाळी हर्बल किंवा माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. नियमित हा उपाय केल्यास केस लांबसडक, दाट दिसण्यास मदत होते आणि केस मऊ, मुलायम दिसतात. या तेलात काही थेंब कॅस्टर ऑईल मिसळा ज्यामुळे याचा परीणाम दुप्पटीनं दिसेल. शॅम्पूऐवजी हर्बल प्रोडक्ट्सचा वापर करा तसंच केसांना हिटिंग टुल्सपासून दूर ठेवा.