Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत केस खूपच तुटताहेत? आठवड्यातून एकदा 'हे' तेल लावा; दाट-लांबच लांब होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 13:23 IST

Which Is Best Hair Oil For Thick Hairs : या उपचारांमध्ये कांद्याचे तेल आणि शुद्ध खोबरेल तेल हे प्रभावी मानले जातात.

लांब काळे आणि दाट केस असावेत अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि योग्य काळजी घेतल्यास ती पूर्ण होऊ शकते. बाजारात अनेक रासायनिक उत्पादनं असली तरी केसांसाठी घरगुती तेल वापरणं हा केसांना नैसर्गिकरित्या पोषण देण्याचा सर्वोत्तम आणि सुरक्षित उपाय आहे. या उपचारांमध्ये कांद्याचे तेल आणि शुद्ध खोबरेल तेल हे प्रभावी मानले जातात. (Which Is Best Hair Oil For Thick Hairs)

कांद्याचे तेल केसांना का लावावे?

कांद्याच्या तेलामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. सल्फर हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे प्रथिनं आहे. केराटिन हा एक महत्वपूर्ण घटक आहे. कांद्याचे तेल केसांसीठी तुटणं कमी करते, केस गळती थांबवते आणि नवीन केस वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे केसांना दाटपणा येतो. यात एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असल्यामुळे टाळूचे आरोग्य चांगले राहते आणि कोंडा कमी होण्यासही मदत होते. 

आलू पराठा लाटताना तुटतो-सारण बाहेर येतं? ८ टिप्स, ढाबास्टाईल परफेक्ट पराठा बनेल घरीच

कांद्याच्या तेलामध्ये समप्रमाणात खोबरेल तेल मिसळून हे तेल कोमट करावे. हे मिश्रण बोटांच्या साहाय्यानं टाळूला हलक्या हातानं लावावे आणि ५ ते ७ मिनिटं मसाज करावी. हे तेल किमान एक तास किंवा रात्रभर ठेवावे आणि नंतर सौम्य शॅम्पूनं केस धुवावेत. हा उपाय आठवड्यातून २ वेळा करावा.

खोबरेल तेल केसांना  का लावावे?

खोबरेल तेल केसांना पोषण देणारे सुपरफूड मानले जाते. यात लॉरिक एसिड नावाचे फॅटि एसिड्स असतात जे केसांच्या मुळांत खोलवर प्रवेश करतात आणि केस गळती कमी करतात. हे तेल केसांना नैसर्गिकरित्या मॉईश्चराईज करते, केसांना चमक देते आणि त्यांचे आरोग्य सुधारते. नियमित मसाज केल्यास रक्त परिसंचयण सुधारते.

आठवड्यातून कितीवेळा- कसे केस धुवावेत? पाहा केस धुण्याची योग्य पद्धत, लांबसडक-दाट होतील केस

अनेक आयुर्वेदीक उपचारांमध्ये खोबरेल  तेलाचा बेस वापरला जातो. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या केस काळे राहण्यास मदत होते. शुद्ध खोबरेल तेल हलकं गरम करून घ्या. हे टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत लावा. हे तेल लावल्यानंतर गरम टॉवेलची वाफ घेतल्यास तेलाचे पोषण केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते. त्यांनतर केस नेहमीप्रमाणे धुवावेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Hair fall in winter? Use this oil once a week.

Web Summary : Onion and coconut oil nourish hair naturally, promoting growth and thickness. Use a warm mix of both, massaging into the scalp. Repeat twice a week for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी