lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > फेशियल की क्लीनअप यात फरक काय? स्किनसाठी काय आवश्यक, 8 गोष्टी माहितीच हव्या..

फेशियल की क्लीनअप यात फरक काय? स्किनसाठी काय आवश्यक, 8 गोष्टी माहितीच हव्या..

फेशियल म्हणजेच क्लीनअप किंवा क्लीनअपलाच फेशियल समजलं जातं आणि गोंधळ उडतो. चेहेरा स्वच्छ करण्याच्या, चमकवण्याच्या या दोन सौंदर्य प्रक्रिया आहेत.फेशियल आणि क्लीनअपमधला फरक आणि साम्य लक्षात घेतलं, दोघांचे नेमके परिणाम समजून घेतले तर आपल्याला काय करायचं असा प्रश्न पार्लरमधे गेल्यानंतर पडणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 02:39 PM2021-10-16T14:39:49+5:302021-10-16T14:46:12+5:30

फेशियल म्हणजेच क्लीनअप किंवा क्लीनअपलाच फेशियल समजलं जातं आणि गोंधळ उडतो. चेहेरा स्वच्छ करण्याच्या, चमकवण्याच्या या दोन सौंदर्य प्रक्रिया आहेत.फेशियल आणि क्लीनअपमधला फरक आणि साम्य लक्षात घेतलं, दोघांचे नेमके परिणाम समजून घेतले तर आपल्याला काय करायचं असा प्रश्न पार्लरमधे गेल्यानंतर पडणार नाही.

What's the difference between a facial and a cleanup? What you need for skin, 8 things you need to know. | फेशियल की क्लीनअप यात फरक काय? स्किनसाठी काय आवश्यक, 8 गोष्टी माहितीच हव्या..

फेशियल की क्लीनअप यात फरक काय? स्किनसाठी काय आवश्यक, 8 गोष्टी माहितीच हव्या..

Highlightsचेहेरा सुंदर करण्यासाठी , स्वच्छ आणि ताजा तवाना दिसण्यासाठी फेशियल केलं जातं.क्लीनअप हे प्रामुख्यानं त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी केलं जातं.क्लीनअप आठवड्यातून किमान दोन वेळेस करणं गरजेचं असतं. फेशियल मात्र महिन्यातून एकदा करावं लागतं.

बर्‍याचदा ब्यूटी पार्लरमधे गेल्यानंतर एका प्रश्नानं गोंधळायला होतं. तुम्हाला फेशियल करायचं की क्लीनअप असं विचारल्यानंतर म्हणजे काय असा प्रश्न अनेकजणींना पडतो. फेशियल म्हणजेच क्लीनअप किंवा क्लीनअपलाच फेशियल समजलं जातं आणि गोंधळ उडतो. चेहेरा स्वच्छ करण्याच्या, चमकवण्याच्या या दोन सौंदर्य प्रक्रिया आहेत. या दोन्ही प्रक्रियांमधे थोडं साम्य असलं तरी दोन्ही प्रक्रिया वेगळ्या आहेत. फेशियल आणि क्लीनअपमधला फरक आणि साम्य लक्षात घेतलं, दोघांचे नेमके परिणाम समजून घेतले तर आपल्याला काय करायचं असा प्रश्न पार्लरमधे गेल्यानंतर पडणार नाही.

Image: Google

फेशियल म्हणजे काय?

फेशियल ही चेहेर्‍यावर केली जाणारी एक सौंदर्य प्रक्रिया आहे. चेहेरा सुंदर करण्यासाठी , स्वच्छ आणि ताजा तवाना दिसण्यासाठी फेशियल केलं जातं. फेशियल करताना क्लीन्जिंग, स्क्रबिंग, स्टीम आणि फेस पॅक या चार टप्प्यांचा समावेश असतो. आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे, त्वचेची समस्या काय आहे हे समजून घेऊन कोणतं फेशियल करायचं हे ठरवलं जातं. फेशियलच्या प्रकारानुसार फेशियलची किंमतही बदलते.

Image: Google

क्लीनअप म्हणजे?

सौंदर्योपचारात फेशियल नंतर क्लीनअप आणि क्लींजिंग येतं. क्लीनअप हे प्रामुख्यानं त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी केलं जातं. क्लीनअप हे आठवड्यातून एकदा करणं आवश्यक असतं. फेशियल आणि क्लीनअपमधे जमीन अस्मानाचा फरक आहे असं नाही. पण क्लीनअप करताना क्लीन्जिंग, स्क्रबिंग आणि स्टीम या तीन गोष्टी तर केल्या जातातच सोबतच क्लीनअप करताना दहा मिनिटांचा मसाजही केला जातो. यामुळे त्वचा चमकते, चेहेर्‍यावर तेज येतं. फेशियलच्या तुलनेत क्लीनअप लवकर होतं.

Image: Google

फेशियल आणि क्लीनअपमधले 7 फरक
1. स्टेपप्रमाणे बघितलं गेलं तर फेशियल आणि क्लीनअप या दोन प्रक्रिया समानच असतात. फक्त मसाज आणि स्टीम करण्याच्या कृतीमधे थोडं अंतर असतं.
2. क्लीनअपमधे मसाज कमी वेळ आणि फेशियलमधे मसाज अधिक वेळ केला जातो.
3. फेशियल, क्लीनअपच्या तुलनेत थोडं महाग असतं आणि चेहेर्‍यासाठी ते प्रभावी ठरतं.
4. क्लीनअप आठवड्यातून किमान दोन वेळेस करणं गरजेचं असतं. फेशियल मात्र महिन्यातून एकदा करावं लागतं.
5. चेहेर्‍यावर मुरुम पुटकुळ्या असतील तर महिला फेशियल किंवा क्लीनअप करुन घेतात. फेशियल केल्यानं चेहेर्‍याच्या त्वचेवर आतून दाब पडतो आणि मुरुम पुटकुळ्यांसारखी समस्या कमी होतात. क्लीनअप केल्यानं चेहेरा स्वच्छ होतो. पण हा इफेक्ट चेहेर्‍यावफ आठे ते दहा दिवस टिकतो.
6. जर त्वचा तेलकट असेल तर फेशियल करणं उत्तम असं सौंदर्य तज्ज्ञ सांगतात. कारण फेशियलच्या प्रक्रियेद्वारे चेहेर्‍यावर तयार होणारं अतिरिक्त तेल निघून जातं. त्वचा चमकते. तेलकट त्वचेची समस्या कमी करण्यासाठी फेशियल करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
7. चेहेर्‍यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फेशियल हा सौंदर्योपचार फायदेशीर मानला जातो. कारण फेशियल करताना चेहेर्‍याच्या नसा ताणल्या जातात, त्यावर जोर पडतो, चेहेर्‍याच्या त्वचेखालील रक्तप्रवाह सुरळीत आणि वेगवान होतो, यामुळे चेहेर्‍यावर सुरकुत्या पडत नाही. पण क्लीनअप हे आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस करावं लागतं. यात असलेल्या सातत्यामुळे, वारंवारितेमुळे चेहेर्‍यावर वयाच्या खुणा दिसत नाही.

f

Image: Google

 1 साम्य

 फेशियल आणि क्लीनअप यांच्यातला फरक समजून घेताना दोघांमधलं साम्यही बघावं. या दोन्ही प्रक्रियांमुळे चेहर्‍यावरील मृत त्वचा निघून जाते. म्हणूनच तुम्ही फेशियल करा किंवा क्लीनअप, ते केलं की चेहेरा स्वच्छ होतो, चेहेर्‍यावर तेज येतं. या दोन्ही प्रक्रियांमुळे चेहेर्‍यावरील त्वचेवर बसलेली धूळ, माती निघून जाऊन चेहेरा स्वच्छ होतो.त्यामुळे पार्लरमधे जाताना आपल्याकडे वेळ, पैसे किती आहेत, आपल्या चेहेर्‍याची समस्या आणि गरज काय आहे हे ओळखून फेशियल करायचं की साधं क्लीनअप हे आधीच ठरवून घ्यावं.

Web Title: What's the difference between a facial and a cleanup? What you need for skin, 8 things you need to know.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.