How To Use Raw Milk for Facial Hair: कोणत्याही महिला किंवा तरूणींना चेहऱ्यावरचे केस नकोसे असतात. हे अनावश्यक केस दूर करण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम्सचा, व्हॅक्सचा वापर केला जातो. पण हेच केस आपण काही नॅचरल उपाय करूनही दूर करू शकतो. कच्चं आणि काही गोष्टींचा वापर करून ही समस्या दूर केली जाऊ शकते. महत्वाची बाब म्हणजे या उपायांचे कोणते साइड इफेक्ट्सही नाहीत. अशात दुधाचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरतं. चला तर पाहुयात दुधात मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील केस दूर होतील.
कच्चं दूध आणि हळद
चेहऱ्यावरील केस दूर करण्यासाठी दूध आणि हळदीचं मिश्रण खूप प्रभावी उपाय आहे. यासाठी एक चमचा दूध घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद पावडर घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. २० ते २५ मिनिटांनंतर हलक्या हातानं त्वचा घासा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. हळदीमधील अॅंटी-बॅक्टेरिअल गुणांनी त्वचेचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच त्वचा साफ होते आणि केसही दूर होतात.
कच्चं दूध आणि बेसन
चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी कच्च्या दुधात बेसनही मिक्स करू शकता. एक चमचा दूध घ्या आणि त्यात एक चमचा बेसन मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. २० ते २५ मिनिटांनंतर पेस्ट केसांच्या विरूद्ध त्वचा घासा. नंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवून घ्या. केस दूर झालेले दिसतील.
कच्चं दूध आणि मध
कच्च्या दुधात मध मिक्स करून चेहऱ्यावरील केस काढू शकता. एका पॅनमध्ये कच्चं दूध घ्या आणि त्यात मध टाका. ही पेस्ट थोडी गरम केल्यावर चेहऱ्यावर लावा. नंतर ही पेस्ट वॅक्ससारखी खेचून काढून टाका. पेस्ट फार जास्त गरम करू नका.
कच्चं दूध आणि तांदळाचं पीठ
चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी दुधात तांदळाचं पीठ मिक्स करून लावू शकता. यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घ्या. यात एक चमचा दूध मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर हेअर ग्रोथच्या उलट्या दिशेने घासत साफ करा. नंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवा. काही दिवस हा उपाय केल्यावर आपल्याला फरक दिसून येईल.