Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुरूम फोडले आणि चेहऱ्यावर खड्डे पडलेत? पाहा 'हे' खड्डे भरण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:37 IST

Scars and Pits Home Remedies: बरेच लोक मुरुम फोडतात त्यामुळेही चेहऱ्यावर खड्डे पडतात. मात्र, काही लोकांच्या चेहऱ्यावर मुरुम नसतानाही खड्डे पडतात. हे दिसायला चांगले वाटत नाहीत, त्यामुळे अनेकजण त्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात.

Scars and Pits Home Remedies: चेहऱ्यावर खड्डे प्रामुख्याने मुरुमांमुळे पडतात. मुरुमांमुळे त्वचेच्या टिश्यूजना इजा होते आणि कोलेजन योग्य प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे त्वचेवर खड्डे दिसू लागतात. बरेच लोक मुरुम फोडतात त्यामुळेही चेहऱ्यावर खड्डे पडतात. मात्र, काही लोकांच्या चेहऱ्यावर मुरुम नसतानाही खड्डे पडतात. हे दिसायला चांगले वाटत नाहीत, त्यामुळे अनेकजण त्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हालाही चेहऱ्यावर खड्डे पडत असतील, तर अ‍ॅलोवेरा, मध, नारळ तेल आणि बेसन-दूध यांसारखे घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात. गंभीर खड्ड्यांसाठी केमिकल पीलिंग, मायक्रोनीडलिंग यांसारखे मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध असले तरी, अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

चेहऱ्यावरील खड्डे कसे कमी करावेत?

अ‍ॅलोवेरा जेल थेट खड्ड्यांवर लावा. त्यात व्हिटामिन E कॅप्सूल मिसळल्यास परिणाम अधिक चांगला दिसू शकतो. मध आणि दालचिनी पावडर यांची पेस्ट बनवून लावा. यामुळे मुरुम आणि खड्डे कमी होण्यास मदत होते. नारळ तेल त्वचेला ओलावा देतं आणि हीलिंग प्रक्रिया लवकर करतं. ते नियमितपणे लावा. बेसन, मध आणि दूध मिसळून पेस्ट तयार करा. सुकल्यावर चेहरा धुवा. यामुळे पोअर्स टाइट होतात आणि खड्डे काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

चेहऱ्यावरील खड्डे भरून येण्यासाठी काय खावे?

त्वचेच्या आरोग्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. व्हिटामिन C भरपूर असलेले पदार्थ खा जसे की स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, किवी, ब्रोकली ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स साठी अक्रोड, जवस, सोयाबीन, झिंकयुक्त पदार्थ बीन्स आणि झिंकने भरपूर असलेले इतर अन्नपदार्थ यासोबतच रोज पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे, कारण त्वचेच्या आरोग्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Home remedies to reduce acne scars and pits on face.

Web Summary : Acne scars? Try aloe vera, honey, coconut oil, or besan-milk paste. Diet rich in vitamin C, omega-3, zinc, and hydration is crucial. For severe cases, consult a doctor.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स