Join us

पावसाळ्यात आंघोळीनंतर चेहऱ्याला लावा 'या' गोष्टी, दिवसभर चेहरा राहील फ्रेश आणि सतेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:08 IST

Skin Care In Monsoon : आंघोळ केल्यानंतर आणि आधी या दिवसात त्वचेवर काही गोष्टी लावल्यास त्वचा नेहमीच चमकदार, मुलायम आणि तजेलदार दिसू शकेल.

What to Apply on Face in Monsoon: पावसाच्या दिवसांमध्ये वातावरणातील आर्द्रता आणि घामामुळे त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. त्वचेवर पुरळ, फोड येऊ लागतात. इतकंच नाही तर या दिवसात त्वचेवर चिकटपणाही येतो. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी लागते. आंघोळ केल्यानंतर आणि आधी या दिवसात त्वचेवर काही गोष्टी लावल्यास त्वचा नेहमीच चमकदार, मुलायम आणि तजेलदार दिसू शकेल. पाहुया आंघोळीआधी आणि नंतर चेहऱयावर काय लावाल.

कोरफड

पावसाळ्यात आंघोळीनंतर चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर लावायला हवा. यासाठी कोरफडीचा ताजा गर घ्या. हा चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांसाठी तसाच ठेवा. हवं तर यात तुम्ही थोडं बेसनही टाकू शकता. नंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवा. बेसनामुळे त्वचेतील एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल. सोबतच पोर्सही हेल्दी राहतील.

गुलाबजल

पावसाळ्यात आंघोळ केल्यावर तुम्ही चेहऱ्यावर गुलाबजलही लावू शकता. हे तुम्ही टोनरच्या रूपात लावू शकता. गुलाबजलमुळे त्वचेची चमक वाढते. तसेच यानं त्वचेची पीएच लेव्हलही बॅलन्स राहते. आंघोळीनंतर गुलाबजल चेहऱ्यावर स्प्रे करा. यानं दिवसभर त्वचा उजळ दिसेल.

तांदळाचं पाणी

तांदळाचं पाणी सुद्धा तुम्ही लावू शकता. याचाही टोनरसारखा वापर करू शकता. आंघोळीनंतर चेहऱ्यावर तांदळाचं पाणी लावाल तर त्वचा हेल्दी राहील. त्वचेची रंगत वाढेल आणि डागही कमी होतील. तांदळाच्या पाण्यानं त्वचेची घामामुळे होणारी जळजळ कमी होते. तसेच पिंपल्स दूर होतात.

कच्चं दूध

आंघोळीनंतर त्वचेवर कच्चं दूध लावणं सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. कच्च्या दुधानं त्वचेची आतपर्यंत स्वच्छता होते. यानं त्वचा हायड्रेट होते आणि त्वचेची चमक वाढते. एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे दूध घ्या आणि कॉटनच्या मदतीनं चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवा. यानं त्वचेची रंगत वाढेल आणि त्वचा मुलायम होईल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्समोसमी पाऊस