Join us

सकाळी झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर लावा 'या' ४ पैकी कोणतीही एक गोष्ट, दिवसभर दिसाल फ्रेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:29 IST

What to Apply on Face After Waking Up: जर सकाळी चेहरा चांगला स्वच्छ केला तर दिवसभर त्वचा चांगली दिसेल. अशात सकाळी चेहऱ्यावर काय लावावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

What to Apply on Face After Waking Up: सगळ्यांनाच चमकदार आणि सुंदर चेहरा हवा असतो. पण सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही रोज काही गोष्टी न विसरता केल्या तर तुमची त्वचा चमकदार, मुलायम आणि हेल्दी राहील. त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी त्वचेवरील मळ, धूळ, तेल साफ करावं लागतं. खासकरून सकाळी चेहऱ्या चांगली स्वच्छता करणं गरजेचं असतं. जर सकाळी चेहरा चांगला स्वच्छ केला तर दिवसभर त्वचा चांगली दिसेल. अशात सकाळी चेहऱ्यावर काय लावावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.सकाळी झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर काय लावावं?

१) कोरफडीचा गर

सकाळी झोपेतून उठल्यानंतर चेहऱ्यावर कोरफडीचा जेल लावू शकता. कोरफडीच्या गरानं त्वचा मॉइश्चराइज होते. सकाळी जर कोरफडीचा गर चेहऱ्याला लावाल तर चेहरा दिवसभर फ्रेश दिसेल. सोबतच यानं चेहरा मुलायम होतो. कोरफडीच्या गराचं त्वचा हायड्रेट होते. सोबतच चेहऱ्यावरील डाग, ड्रायनेस दूर होण्यासही मदत मिळते.

२) गुलाब जल

सकाळी एक पाण्यानं चेहरा धुतल्यावर नंतर गुलाब जल लावल्यास त्वचेसाठी चांगलं असतं. गुलाब जलमुळे त्वचे हायड्रेट होते. गुलाब जलचा वापर तुम्ही क्लींजर म्हणूनही करू शकता. कापसाच्या बोळ्याच्या मदतीनं चेहऱ्या गुलाब जलनं स्वच्छ करा. गुलाब जलमुळे चेहरा दिवसभर ग्लोईंग आणि फ्रेश दिसतो.

३) मध

त्वचेसाठी मध खूप फायदेशीर मानलं जातं. मधानं त्वचा मॉइश्चराईज होते. जर रोज सकाळी चेहऱ्यावर थोडं मध लावलं तर त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. चेहऱ्यावर रोज मध लावाल तर चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील.

४) कच्च दूध

त्वचेसाठी दुधाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. वेगवेगळ्या फेसपॅकमध्ये कच्च दूध वापरलं जातं. कापसाच्या मदतीनं चेहऱ्यावर कच्च दूध लावू शकता. यानं चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत मिळते. तसेच त्वचेला पोषणही मिळतं. तसेच दिवसभर चेहरा फ्रेश आणि ग्लोईंग दिसतो.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स