Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्वचा साफ, चमकदार करण्यासाठी कॉफी ठरते वरदान...पाहा नेमका वापर कसा करावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:08 IST

Coffee for Skin : कॉफी त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते, पण तिचा योग्य वापर करता यायला हवा. जाणून घेऊया कॉफीचा त्वचेसाठी योग्य वापर आणि याने कोणत्या समस्या दूर होतात.

Coffee for Skin : कॉफी प्यायल्याने फ्रेश वाटतं आणि सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. कॉफीची आणखी एक खासियत म्हणजे ती त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. वेगवेगळ्या प्रकारे कॉफी त्वचेसाठी वापरू शकता. यात अँटी-ऑक्सिडेंट, कॅफीन आणि एक्सफोलिएटिंग गुण भरपूर असतात, जे त्वचेसाठी वरदान ठरतात. अशात कॉफीने त्वचेच्या कोणत्या समस्या दूर होतात आणि तिची वापर कसा करावा हे जाणून घेऊया.

त्वचेसाठी वरदान कॉफी

कॉफीमध्ये कॅफीक अ‍ॅसिड, क्लोरोजेनिक अ‍ॅसिड आणि पॉलीफेनॉल असतात. हे अँटी-ऑक्सिडेंट्स फ्री रॅडिकल्ससोबत लढतात. जेव्हा आपण कॉफी त्वचेवर लावतो, तेव्हा त्वचेचं पर्यावरणामुळे होणारं नुकसान आणि वेळेआधीच येणारं म्हातारपण टाळता येतं. त्याशिवाय त्यात कॅफीनही असतं. जेव्हा ही त्वचेवर लावली जाते तेव्हा कॅफीनने रक्तप्रवाह वाढतो, सूजही कमी होते.

कोणत्या समस्या होतील दूर?

डेड स्किन दूर करण्यास - कॉफीचा वापर त्वचेवर जमा झालेली मृत त्वचा हटवण्यासाठी केला जाऊ शकतो. दोन चमचे कॉफी पावडरमध्ये एक चमचा खोबऱ्याचं तेला किंवा मध मिक्स करा. हे मिश्रण ओल्या त्वचेवर लावा आणि दोन ते तीन मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा व एखादं माइल्ड माॉइश्चरायजर लावा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता.

निर्जीव त्वचा होईल चमकदार - त्वचा जर निर्जीव दिसत असेल, थकलेली दिसत असेल कॉफीचा मास्क यावर फायदेशीर ठरू शकतो. कॉफीमधील अँटी-ऑक्सिडेंटने निर्जीव त्वचा पुन्हा फ्रेश आणि टवटवीत दिसू लागेल. तसेच कॅफीनने रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे त्वचेवर नॅचरल चमक आणि तेज येतं. यासाठी एक मोठा चमचा कॉफी पावडर, एक चमचा दही आणि अर्धा चमचा हळद मिक्स करा. हे मिश्रण साफ चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटे हे तसंच लावून ठेवा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

पिंपल्स दूर करेल कॉफीचा मास्क - कॉफीमधील क्लोरोजेनिक अ‍ॅसिड सूज कमी करण्यास आणि बॅक्टेरिया रोखण्यास मदत करतं. तर मधाने संवेदनशील त्वचेला आराम मिळतो. यासाठी एक मोठा चमचा कॉफी पावडरमध्ये एक मोठा चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. २० मिनिटे तसंच लावून ठेवा, नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Coffee: A boon for clean, glowing skin; here's how to use it.

Web Summary : Coffee's antioxidants and caffeine benefit skin, fighting damage and boosting circulation. It can exfoliate dead skin with coconut oil or honey. Coffee masks with yogurt and turmeric brighten dull skin. Mixed with honey, it helps reduce inflammation and acne.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स