What to Use on Face After Alum: त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुरटीचा वापर आजकाल खूप केला जातो. त्वचेवरील डाग घालवण्यासाठी, पुरळ घालवण्यासाठी, टॅनिंग दूर करण्यसाठी तुरटी(Fitkari) त्वचेवर वेगवेगळ्या पद्धतीनं लावली जाते. अनेक स्किन एक्सपर्ट सुद्धा याबाबत सल्ला देतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक महिला किंवा पुरूषही तुरटी त्वचेवर लावतात. पण तुरटी लावल्यानंतर त्वचेवर काय लावलं पाहिजे हे माहीत असणंही तेवढंच महत्वाचं आहे. कारण त्वचेवर तुरटी लावल्यानं त्वचा ड्राय होते. अशात तुरटी लावल्यानंतर त्वचा ड्राय झाली असेल तर काय करावं हे आपण जाणून घेणार आहोत.
गुलाबजल
त्वचा जर ड्राय झाली असेल किंवा होऊ द्यायची नसेल तर तुरटी लावल्यावर तुम्ही त्वचेवर गुलाबजल लावू शकता. गुलाबजलचा वापर टोनरसारखा केला जातो. यानं त्वचा हायड्रेट होते आणि त्वचेमध्ये ओलावा राहतो. तसेच गुलाबजल लावल्यानं त्वचेची पीएच लेव्हलही बॅलन्स होते.
मॉइश्चरायजर
गुलाबजल सोबतच तुम्ही त्वचेवर तुम्ही मॉइश्चरायजर लावू शकता. यानं त्वचा रखरखीत आणि निर्जीव दिसत नाही. तुरटी लावल्यावर मॉइश्चरायजर लावल्यानं त्वचा मुलायम आणि चमकदार बनते. तुम्ही तुमच्या स्किन टाइपनुसार मॉइश्चरायजरची निवड करू शकता.
व्हिटामिन सी सीरम
व्हिटामिन सी सीरम हे एकप्रकारचं अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. व्हिटामिन सी सीरमनं त्वचा हेल्दी होते. 4 ते 5 थेंड सीरम चेहऱ्यावर लावावं. यानं त्वचेवरील डाग जातील आणि चेहरा उजळेल. तुरटी लावल्यावर तुम्ही हे त्वचेवर लावू शकता.
सनस्क्रीन
त्वचा ड्राय होऊ नये म्हणून तुम्ही तुरटी लावल्यावर त्वचेवर सनस्क्रीन सुद्धा लावू शकता. सनस्क्रीनमुळे त्वचा मुलायम होते, सोबतच उन्हापासूनही बचाव होतो. सनस्क्रीननं टॅनिंग आणि सनबर्न कमी होतं.
खोबऱ्याचं तेल
तुरटी लावल्यावर जर त्वचा ड्राय होत असेल तर खोबऱ्याचं तेलही लावू शकता. खोबऱ्याचं तेलानं त्वचा मुलायम होते. यानं ड्रायनेस कमी होते. खोबऱ्याचं काही थेंब तेला चेहऱ्यावर लावून हलक्या हातानं मसाज करा. यानं ब्लड सर्कुलेशनही वाढेल, ज्यामुळे त्वचेवर ग्लो येईल.