आपण रिल्समध्ये सारखे बघतोच की सगळे कोरियन लोकांच्या त्वचेचे कौतुक करत असतात. (What is the secret of Korean glass skin? see the ingredients )त्याच्यासारखी त्वचा आपलीही असायला हवी असे महिलांना वाटते. खास म्हणजे तरूणांमध्ये कोरियन लोकांचे फॅड जास्त आहे. कोरियन अभिनेत्री तसेच गायकांना भारतीय तरुण पिढी फॉलो करते. भारतामध्ये आता जागोजागी कोरियन खाद्यपदार्थ मिळतात. (What is the secret of Korean glass skin? see the ingredients )तसेच कोरियन फेस क्रीम किंवा इतर ब्यूटी प्रॉडक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. असं कोरियन लोक काय वेगळं करतात की त्यांच्या पद्धतींचा वापर करण्यासाठी नवी पिढी एवढी उत्सुक असते?
कोरियन लोकांची त्वचा छानच असते यात काही वाद नाही. मात्र ते असं काहीही वेगळं वापर नाहीत जे आपण कधी पाहीले नसेल. कोरियन लोक झोपताना कोणता पॅक लावतात हा विषय मध्यंतरी इंस्टाग्रामवर फारच चर्चेत होते. पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की ते जो पदार्थ त्वचेसाठी वापरतात तो आपले पूर्वज पिढ्यानुपिढ्या वापरत आले आहेत. तो पदार्थ म्हणजे तांदूळ. तांदळामध्ये इनोसिटॉल तसेच अँटीऑक्सिडंट असतात. (What is the secret of Korean glass skin? see the ingredients )अमीनो अॅसिड असते त्वचेसाठी ते उत्तम आहे. तांदळाचा पॅक कोरियन लोक वापरतात. अगदी सोपा आहे. घरीच तयार करा.
कृती
१. वाटीभर तांदूळ घ्या. ते जरा २ ते ३ तास पाण्यामध्ये भिजत घाला. तांदूळ धुऊ नका त्याचे पहिले निघणारे पाणी महत्त्वाचे आहे.
२. ३ तासांनंतर एका वाटीमध्ये ३ ते ४ चमचे कोरफडीचा अर्क घ्या. विकतचे अॅलोवेरा जेल चालेल. पण जर कोरफड मिळाली तर उत्तमच. (What is the secret of Korean glass skin? see the ingredients )
३. आता त्या कोरफडीच्या अर्कामध्ये भिजवलेल्या तांदळाचे पाणी घाला. तांदूळ नाही फक्त पाणी. त्यामध्ये चमचाभर गुलाब पाणी घाला. चमचाभर खोबरेल तेल घाला.
४. त्यामध्ये दोन जीवनसत्त्व 'ई' च्या गोळ्या फोडून घाला. आता ते मिश्रण मऊसर होईपर्यंत चमच्याने हलवत राहा.
५. हवा बंद डब्यामध्ये काढून घ्या. रात्री झोपताना चेहर्याला लावा.