Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी वॅक्स करता? आधी घ्या 'ही' काळजी नाही तर त्वचेचं होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:45 IST

Facial Waxing Tips : फेशिअल वॅक्सिंग करत असताना काही गोष्टींची काळजी घेणंही महत्वाचं ठरतं. ज्याबाबत अनेकांना माहिती नसते. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण माहीत असणं गरजेच्या असतात. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत.

Facial Waxing Tips : चेहऱ्यावरील अनावश्यक केस महिलांचं सौंदर्य कमी करतात. अशात जास्तीत जास्त महिला हे चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. त्यात एक कॉमन उपाय म्हणजे वॅक्सिंग. वॅक्सिंग करून चेहऱ्यावरील हे अनावश्यक केस तर निघतात. पण हे करत असताना काही गोष्टींची काळजी घेणंही महत्वाचं ठरतं. ज्याबाबत अनेकांना माहिती नसते. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण माहीत असणं गरजेच्या असतात. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत.

वॅक्स करण्याची पद्धत

अनेकजण घरीच वॅक्स करतात, पण चेहऱ्यावर वॅक्स करणं इतकं सोपं नसतं. चेहऱ्यावर वॅक्स करण्याआधी हे तपासून बघा की, तुम्हाला योग्यप्रकारे वॅक्स करता येतं का? येत नसेल तर स्किनचं नुकसान होऊ शकतं. वॅक्सचं टेम्प्रेचर, स्ट्रिप सगळं काही योग्य असावं.

स्किन इन्फेक्शन असेल तर टाळा

फेशिअल वॅक्सिंग प्रत्येकासाठी चांगला पर्याय नसतो. तुम्हाला जर स्किन इन्फेक्शन असेल किंवा पुरळ आली असेल तर चेहऱ्यावर वॅक्स करू नका. जर तुमच्या चेहऱ्यावर जास्त केस असतील आणि हे जेनेटिक असतील किंवा एखाद्या हार्मोनल असंतुलनामुळे असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने लेजरचा पर्याय निवडावा. जर तुमच्या हनुवटीवर किंवा गालांवर दाढीसारखे केस येत असतील तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

फेशिअल वॅक्सआधी काय करावं?

चेहऱ्यावर वापरलं जाणारं वॅक्स, दुसऱ्या वॅक्सपेक्षा वेगळं असतं. हे फार मुलायम असतं, जेणेकरून स्किनवर रॅशेज येऊ नये आणि जळजळ होऊ नये. चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी ज्या वॅक्सचा वापर करत असाल त्यात अॅलोव्हेरा, मध असतं. जेणेकरून कमीत कमी नुकसान व्हावं. तसेच असं असावं जे जास्त दिवस चालावं.

वॅक्स केल्यानंतर काय करावं?

फेशिअल वॅक्स केल्यानंतरही त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. वॅक्स केल्यानंतर कोणतंही चांगलं मॉइश्चरायजर लावा. त्यासोबतच साबणाऐवजी चेहरा धुण्यासाठी फेस वॉशचा वापर करावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Facial Waxing: Precautions to Avoid Skin Damage, Essential Tips

Web Summary : Facial waxing removes unwanted hair, but precautions are vital. Check waxing technique, avoid during skin infections. Use gentle wax with aloe vera, moisturize, and use face wash afterward for care.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स