Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनस्क्रीनच्या ट्यूबवर लिहिलेल्या pH चा फुल फॉर्म काय? रोज लावत असाल तरीही नसेल माहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:34 IST

Interesting Facts : जेव्हा सनस्क्रीनचा विषय येतो, तेव्हा पीएच लेव्हलचा विषय निघतो. म्हणजे स्किन एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, सनस्क्रीन घेताना नेहमीच पीएच चेक करा.

Interesting Facts : उन्हाळा आता बऱ्यापैकी सुरू झालाय. उन्हाचे चटके चांगलेच जाणवायला लागले आहेत. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे चटके तर लागतातच, सोबतच घाम येतो आणि त्वचाही काळवंडते. अशात बरेच लोक खासकरून महिला त्वचेचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरतात. सनस्क्रीनमुळे त्वचा काळवंडण्याचा धोका कमी करता येतो. जेव्हा सनस्क्रीनचा विषय येतो, तेव्हा पीएच लेव्हलचा विषय निघतो. म्हणजे स्किन एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, सनस्क्रीन घेताना नेहमीच पीएच चेक करा. पण पीएच काय असतं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण समजून घेणार आहोत.

pH चा फुल फॉर्म

रसायनशास्त्रात pH म्हणजे “Potential of Hydrogen”. हा एक मोजमापाचा स्केल आहे जो एखाद्या पदार्थाची आम्लता, क्षारता किंवा तटस्थता दर्शवतो.

pH स्केल साधारणपणे असा असतो:

pH 0 ते 7 – आम्लीय

pH 7 – तटस्थ

pH 7 ते 14 – क्षारीय

पाण्याचे प्रमाण असलेल्या जवळपास सर्व पदार्थांचा pH मोजता येतो, ज्यामध्ये आपल्या त्वचेचाही समावेश होतो. प्रौढ व्यक्तींच्या त्वचेचा सामान्य pH साधारण 5.5 असतो, जो थोडा आम्लीय असतो. ही आम्लता त्वचेतील नैसर्गिक तेलांचे संतुलन राखण्यास आणि नुकसानकारक बॅक्टेरियापासून संरक्षण करण्यास मदत करते.

pH बिघडल्यास काय होते?

जर आपण खूप जास्त क्षारीय साबण किंवा स्किनकेअर उत्पादने वापरली तर त्वचेचा नैसर्गिक pH बिघडू शकतो.

त्वचा कोरडी पडू शकते

पिंपल्स किंवा इरिटेशन होऊ शकते

त्वचेची संरक्षण क्षमता कमी होऊ शकते

म्हणून पुढच्या वेळी सनस्क्रीन खरेदी करताना फक्त ब्रँड किंवा पॅकेजिंग न पाहता त्यावरील pH, PA आणि SPF यांसारखी माहितीही जरूर तपासा. त्यामुळे तुमच्या त्वचेसाठी योग्य उत्पादन निवडणे सोपे होईल.

सनस्क्रीनवर लिहिलेल्या इतर गोष्टी

सनस्क्रीनच्या पॅकेजिंगवर pH व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे शब्दही लिहिलेले असतात, जसे की PA Rating आणि Sun Protection Factor.

PA (Protection Grade of UVA) : हे दर्शवते की सनस्क्रीन UVA किरणांपासून किती प्रभावी संरक्षण देते. UVA किरणांमुळे त्वचा लवकर वृद्ध दिसू शकते.

SPF (Sun Protection Factor) : हे UVB किरणांपासून मिळणाऱ्या संरक्षणाचे मोजमाप आहे. UVB किरणांमुळे सनबर्न होऊ शकतो.

म्हणून पुढच्या वेळी सनस्क्रीन खरेदी करताना फक्त ब्रँड किंवा पॅकेजिंग न पाहता त्यावरील pH, PA आणि SPF यांसारखी माहितीही जरूर तपासा. त्यामुळे तुमच्या त्वचेसाठी योग्य उत्पादन निवडणे सोपे होईल.  

सनस्क्रीन लावण्याची योग्य वेळ

जास्तीत जास्त हेच बघायला मिळतं की, सनस्क्रीन लावलं की, लोक घरातून बाहेर पडतात. पण सनस्क्रीन लावण्याची ही पद्धत चुकीची आहे. कधीही बाहेर उन्हात जाण्याचा प्लॅन असेल तर बाहेर पडण्याच्या साधारण 10 ते 15 मिनिट आधीच सनस्क्रीन लावा असं केल्याने सनस्क्रीनला त्वचेवर त्याचं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि नंतर याने तुमचा उन्हापासून चांगला बचावही होतो.  

एसपीएफची काळजी

सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात तो म्हणजे एसपीएफ. कधीही सनस्क्रीन खरेदी करताना एसपीएफवर लक्ष दिलं पाहिजे. कारण एसपीएफ सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. हे एक रेटींग फॅक्टर आहे जे दुर्शवतं की, कोणतं सनस्क्रीन किंवा सनब्लॉक तुमचा कोणत्या स्तरापर्यंत बचाव करतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunscreen pH: What does it mean? You probably don't know!

Web Summary : Sunscreen's pH level, 'Potential of Hydrogen', indicates acidity/alkalinity. Maintaining skin's pH (around 5.5) is crucial. Check pH, PA, SPF for proper sun protection. Apply 10-15 minutes before sun exposure.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसोशल व्हायरल