Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्वचेवर पूर? चेहरा मऊमुलायम ठेवण्यासाठी ‘स्किन फ्लडिंग’ नावाचा मोठा ट्रेंड-तरुण जगात जो तो हेच करतोय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:28 IST

What is Skin Flooding Trend: स्किन फ्लडिंगने त्वचेमध्ये ओलावा कायम राहतो. त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचा मुलायम करण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. 

What is Skin Flooding Trend: त्वचेची काळजी घेण्यासाठीचे, ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठीचे वेगवेगळे स्किन केअर ट्रेंड हल्ली व्हायरल होत असतात. जे वापरून मुलायम आणि चमकदार त्वचा मिळते. सध्या असाच एक स्किन केअर ट्रेंड चर्चेचा विषय ठरत आहे. तो म्हणजे स्किन फ्लडिंग. आंघोळ केल्यानंतर जर आपली त्वचा ताणली जात असेल किंवा मेकअप कोरड्या जागांवर घट्ट बसत असेल तर स्किन फ्लडिंग फायदेशीर ठरू शकतं. स्किन फ्लडिंगने त्वचेमध्ये ओलावा कायम राहतो. त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचा मुलायम करण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. 

काय आहे स्किन फ्लडिंग?

स्किन फ्लडिंग एक हायड्रेशन बेस्ड स्किनकेअर रूटीन आहे. ज्यात चेहरा धुतल्यानंतर हलक्या ओल्या स्किनवर एकावर एक हायड्रेटिंग प्रॉडक्ट्स लावले जातात. याचा उद्देश त्वचेत ओलावा कायम ठेवणे आणि जास्त वेळ लॉक करणे हा असतो. जेव्हा त्वचा चांगल्या प्रकारे हायड्रेट राहते, तेव्हा जास्त फ्रेश, मुलायम आणि चमकदार दिसते. हा उपाय ड्राय स्किन असलेल्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल.

४ स्टेप रूटीन कसं फॉलो कराल?

सगळ्यात आधी हलकं क्लींजरने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर चेहरा पूर्णपणे कोरडा करण्याऐवजी थोडा ओला राहू द्या. 

दुसऱ्या स्टेपमध्ये हायड्रेटिंग टोनर किंवा फेस मिस्ट लावा.

तिसऱ्या स्टेपमध्ये ग्लिसरीन असलेलं सीरम लावा. ज्याने त्वचेत ओलावा राहण्यात मदत होते.

शेवटी मॉइश्चरायजर लावून ओलावा लॉक करा.

कुणी घ्यावी काळजी?

स्किन केअरचा हा ट्रेंड जरी सोपा असला तरी सगळ्यांची त्वचा एकसारखी नसते. तेलकट किंवा अॅक्ने असलेल्या त्वचेवर जास्त हेवी प्रॉडक्ट्स लावणं टाळलं पाहिजे. याने पोर्स बंद होतात आणि पिंपल्सची समस्या वाढते. त्यामुळे हलके आणि पिंपल्स न आणणाऱ्या प्रॉडक्ट्सचा वापर केला पाहिजे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Skin flooding: New skincare trend for glowing, hydrated skin goes viral.

Web Summary : Skin flooding, a hydration-based routine, involves layering hydrating products on damp skin to lock in moisture. Ideal for dry skin, it involves cleansing, toning, applying a glycerin serum, and moisturizing. Oily or acne-prone skin should use lighter, non-comedogenic products to avoid breakouts.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स