Join us

तुम्हाला माहिती आहे का, डार्क सर्कल नक्की कशामुळे येतात? येऊच नयेत म्हणून खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 14:48 IST

Dark Circles: डार्क सर्कलनं त्वचेचं सौंदर्य तर बिघडतं, पण शरीराच्या आत होणाऱ्या समस्यांबाबतही कळतं. अशात पाहुया डार्क सर्कल का येतात. 

Dark Circles: अनेकदा सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांखाली काळे डाग दिसतात. या काळ्या डागांना डार्क सर्कल असं म्हणतात. या काळ्या डागांमुळे डोळ्यांचं सौंदर्य तर बिघडतंच, सोबतच चेहऱ्याचं सौंदर्यही हिरावलं जातं. अशात हे डाग दूर करण्यासाठी नेमकं काय करावं? असा प्रश्न आपल्यालाही पडत असेलच. डार्क सर्कल येण्याची कारणं वेगवेगळी असतात. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे झोप पूर्ण न होणे. त्याशिवायही डार्क सर्कलची वेगळी कारणं असतात. डार्क सर्कलनं त्वचेचं सौंदर्य तर बिघडतं, पण शरीराच्या आत होणाऱ्या समस्यांबाबतही कळतं. अशात पाहुया डार्क सर्कल का येतात. 

का येतात डार्क सर्कल?

डोळ्यांखाली डार्क सर्कल्स जास्तकरून त्वचेखालील नसा जास्त दिसल्यानं येतात. जेव्हा त्वचा पातळ होते किंवा शरीरात पाणी कमी झालं तर ही समस्या होऊ शकते. सोबतच फोनवर जास्त वेळ घालवणं, वाढतं वय, कमी झोप, डिहायड्रेशन, अॅलर्जी, जास्त उन्हात राहणे आणि कधी कधी जेनेटिक्स कारणांनी सुद्धा डार्क सर्कलची समस्या होते.

जसजसं वय वाढतं, तसतसा त्वचेचा लवचिकपणा कमी होऊ लागतो आणि कोलेजन लेव्हलही कमी होऊ लागते यामुळे डोळ्यांखालील नसा चेहऱ्यावर जा्सत दिसू लागतात.

इतरही काही कारणं

जर आपण रोज पुरेशी झोप घेत नसाल तर ही समस्या आपल्याला सुद्धा होऊ शकते. कमी झोपेमुळे त्वचा डल होते. डोळ्यांखालील ब्लड वेसल्स सूजतात. ज्यामुळे डार्क सर्कल आणखी डार्क दिसतात. कधी कधी शरीरात पाणी कमी झाल्यानं डोळ्यांखालील त्वचा पिवळी दिसू लागते.

कसे दूर कराल डार्क सर्कल?

डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी रात्री किमान ७ ते ८ तासांची झोप घ्यायला हवी. सोबतच डोळ्यांखाली थंडी टी बॅग किंवा काकडीचे स्लाइस ठेवा. कोल्ड कम्प्रेसचा वापर करूनही तुम्ही डोळ्यांखालील सूज कमी करू शकता. जर आपल्याला डार्क सर्कल लवकर कमी करायचे असतील तर चेहरा धुतल्यानंतर हलकी मसाज करा. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. उन्हात बाहेर पडताना सनग्लासेस आणि सनस्क्रीन लावा.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स