सगळ्यांनाच असं वाटत असतं की, आपला सतेज आणि उजळ दिसावा. लग्न, एखादा इव्हेंट, ऑफिसमधील कार्यक्रम असो यासाठी चेहऱ्यावर लगेच ग्लो हवा असतो. यासाठी जास्तीत जास्त महिला ब्लीच किंवा फेशिअलचा वापर करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दोन्हींचा परिणाम किती वेगळा असतो? म्हणजे या दोन्ही गोष्टींमध्ये काय फरक आहे. तेच आज आपण पाहणार आहोत. अनेक ब्युटी एक्स्पर्ट्स सांगतात की, फेशिअल करताना स्क्रबिंग आणि मसाजमुळे त्वचा आधीच संवेदनशील होते. त्याच वेळी जर ब्लीच केलं, तर जळजळ, रॅशेस किंवा अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो.
आधी ब्लीच की आधी फेशिअल?
ब्यूटी एक्सपर्ट सांगतात की, योग्य पद्धत म्हणजे आधी ब्लीच करून नंतर फेशिअल करणे. त्यामुळे त्वचेला थोडा आराम मिळतो. संवेदनशील स्किन असलेल्या लोकांनी ब्लीच पूर्णपणे टाळावे आणि त्याऐवजी एखादं सॉफ्ट फेशिअल करावं. इंस्टंट ग्लो हवा असेल तर ब्लीच करा. लाँग-लास्टिंग ग्लो आणि हेल्दी स्किनसाठी फेशिअल हा उत्तम पर्याय आहे. पण ब्लीच आणि फेशिअल एकाचवेळी करणं धोकादायक असतं, दोघांमध्ये अंतर ठेवणं गरजेचं आहे.
ब्लीचचे फायदे
- ब्लीचमुळे चेहऱ्यावरील केस त्वचेच्या रंगाशी जुळून जातात.
- यात हायड्रोजन पेरॉक्साइडसारखे केमिकल्स असतात, ज्यामुळे चेहरा लगेच उजळ दिसतो.
- पण याचा परिणाम काही दिवसांपुरताच असतो.
- संवेदनशील त्वचेला जळजळ, खाज किंवा लालसरपणा येऊ शकतो, म्हणून पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
फेशिअलचे फायदे
- फेशियलमध्ये क्लींजिंग, स्क्रबिंग, मसाज आणि मास्क असतो.
- यामुळे डेड स्किन निघून जाते आणि ब्लड सर्कुलेशन सुधारतं.
- फेशिअल प्रॉडक्ट्समध्ये व्हिटामिन्स, हर्ब्स आणि मिनरल्स असतात, ज्यामुळे त्वचेला पोषण मिळतं.
- याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो आणि त्वचेला आराम मिळतो.
ब्लीच हा फक्त तात्काळ उपाय आहे, तर फेशिअल त्वचेला आतून हेल्दी आणि ग्लोइंग बनवतो. नेहमी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार निर्णय घ्या आणि कोणतेही ट्रीटमेंट करण्याआधी स्किन एक्स्पर्टचा सल्ला घ्या.