केस गळण्याची समस्या आज सर्व वयोगटातील लोकांमध्ये सामान्य झाली आहे. पण अनेक वेळा आपण तिचं खरं कारण लक्षात घेत नाही. केस गळण्यामागचं एक महत्त्वाचं आणि दुर्लक्षित कारण म्हणजे केस गुंतणे. (what is a major cause of hair loss? What should we do to prevent your hair from getting tangled? Remember these tips)गुंतलेले केस ब्रश करताना तुटतात, कमजोर होतात आणि त्यांची चमक हरवते. हळूहळू केस पातळ होऊन गळती वाढते.
केस गुंतण्यामागे अनेक कारणं असतात. सर्वात पहिलं म्हणजे ओलाव्याची कमतरता. कोरड्या केसांमध्ये नैसर्गिक तेल नसल्याने ते एकमेकांना चिकटतात आणि गुंततात. दुसरं कारण म्हणजे अति रासायनिक उत्पादने शॅम्पू, सीरम, कलर किंवा स्ट्रेटनिंगमध्ये असलेले रसायन केसांच्या मुळांपासून ओलावा खेचतात. यामुळे केस निस्तेज, राठ आणि गुंतण्यास प्रवृत्त होतात. शिवाय, धूळ, प्रदूषण आणि उन्हाचा तडाखा हे घटकही केसांच्या रचनेवर परिणाम करतात. नियमित तेल न लावल्याने आणि केस ओले असतानाच विंचरण्याच्या सवयीमुळेही केस गुंततात.
मात्र एक महत्वाचे कारण म्हणजे केस मोकळे सोडणे. हेअरस्टाइल करण्यासाठी केस मोकळे ठेवले की वाऱ्यामुळे ते गुंततात. मग तो गुंता काढताना केस तुटतात. केस घट्ट बांधणे गरजेचे असते. वेणी बांधणे हा उत्तम उपाय आहे. केस जेवढे मोकळे तेवढा गुंता जास्त. केसांना स्कार्फ लावा. केसांवरुन कॉटनची ओढणी घ्या. हे उपाय सोपे आणि फायद्याचे असतात.
या समस्येवर उपाय अगदी सोपे आणि घरगुती आहेत. सर्वात प्रथम आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेल किंवा बदाम तेलाने मसाज करा. तेल केसांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांना मऊपणा आणि पोषण देतं. केस धुताना नेहमी माइल्ड शाम्पू आणि नैसर्गिक कंडिशनर वापरा. दही आणि मध यांचा हेअर पॅक लावल्यास केस गुंतत नाहीत आणि चमकदार होतात. अंघोळीनंतर केस सुकल्यावरच हळूवार विंचरावेत. ओले केस नाजूक असतात आणि त्या वेळी जोराने विंचरल्यास ते सहज तुटतात.
गुंता सोडवण्यासाठी लाकडी कंगवा वापरा. जाड दातांचा कंगवा वापरणे फायद्याचे ठरते. गुंता होणे सामान्य आहे, त्यामुळे हा कंगवा प्रत्येकीकडे असायलाच हवा. तसेच वारा असताना, पंख्याखाली, गाडीवर केस अजिबात मोकळे सोडू नका. तो गुंता सोडवणेही कठीण जाते. केसांना लावायचे रबर चांगलेच वापरा. स्क्रंची वापरणे उत्तम, त्यामुळे गुंता होत नाही.
Web Summary : Tangled hair is a key cause of hair fall, worsened by dryness, chemicals, and pollution. Simple remedies include regular oil massages, mild shampoos, and avoiding open hair in wind. Use wooden combs and scrunchies.
Web Summary : उलझे बाल बाल झड़ने का एक मुख्य कारण हैं, जो सूखापन, रसायन और प्रदूषण से बढ़ जाते हैं। नियमित तेल मालिश, हल्के शैंपू और हवा में खुले बालों से बचने जैसे सरल उपाय करें। लकड़ी की कंघी और स्क्रंची का प्रयोग करें।