Lokmat Sakhi >Beauty > 'जेड रोलर' म्हणजे काय ? त्यानं चेहऱ्याला मसाज केला तर चेहऱ्याच्या सगळ्या समस्या गायब होतात, हे खरं आहे ?

'जेड रोलर' म्हणजे काय ? त्यानं चेहऱ्याला मसाज केला तर चेहऱ्याच्या सगळ्या समस्या गायब होतात, हे खरं आहे ?

How To Use A Jade Roller For Skincare : हल्ली सौंदर्यसाधनांच्या ऑनलाईन बाजारात ‘जेड रोलर’ या फेसमसाज साधनाची खूप चर्चा आहे, तुम्ही वापरुन पाहणार असाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 05:36 PM2023-10-11T17:36:03+5:302023-10-11T17:53:43+5:30

How To Use A Jade Roller For Skincare : हल्ली सौंदर्यसाधनांच्या ऑनलाईन बाजारात ‘जेड रोलर’ या फेसमसाज साधनाची खूप चर्चा आहे, तुम्ही वापरुन पाहणार असाल तर...

WHAT IS A JADE ROLLER & HOW TO USE, 5 Benefits of Using A Jade Roller, What Is a Jade Roller? Skin Benefits & How to Use | 'जेड रोलर' म्हणजे काय ? त्यानं चेहऱ्याला मसाज केला तर चेहऱ्याच्या सगळ्या समस्या गायब होतात, हे खरं आहे ?

'जेड रोलर' म्हणजे काय ? त्यानं चेहऱ्याला मसाज केला तर चेहऱ्याच्या सगळ्या समस्या गायब होतात, हे खरं आहे ?

दिवसभराच्या कामाच्या धावपळीत जसे आपण शरीराने थकतो तसेच आपली त्वचा देखील थकते. बिझी लाईफस्टाईल आणि वाढता स्ट्रेस याचे वाईट परिणाम काही अंशी आपल्या स्किनवर देखील होताना दिसतात. अशावेळी त्वचेला फेसमसाजची खूपच आवश्यकता असते. फेसमसाज करण्याच्या आता काही नवीन पद्धती वापरण्यात येत आहेत. सोशल मीडियावरच्या ‘इन्फ्लूएन्सर्स’च्या ‘ब्यूटी रिच्युअल्स’मध्ये तुम्ही ‘जेड रोलर’ नामक (How do you use jade rollers on your skin?) प्रकार निश्चित कधीतरी पाहिला असेल. चेहऱ्याची निगा राखण्याची प्रक्रिया दाखवताना हे लोक ‘जेड रोलर’ हमखास वापरताना दिसतात. साधारणत: हिरव्या किंवा गुलाबी रंगाच्या जेमस्टोनपासून बनवलेला हा छोटा रोलर असतो. चेहऱ्यावर मसाज होण्यासाठी हा रोलर चेहऱ्यावरून विशिष्ट पद्धतीनं सावकाश फिरवतात(5 Benefits of Using A Jade Roller).

चेहऱ्यावर मालिश करणे हा एक प्रकारचा स्ट्रेस दूर करण्याचा सोपा उपाय आहे. ज्यामुळे आपले ब्लड सर्क्युलेशन सुधारते. चेहऱ्याचा मसाज व्यवस्थित केला तर त्वचाही घट्ट होऊ शकते. हे एक अँटी - एजिंग एजंट (HOW TO CORRECTLY USE A JADE ROLLER) म्हणून काम करते. जर आपण दररोज चेहऱ्याचा मसाज करत असाल तर त्यामुळे आपला मूडही सुधारतो व यामुळे आपल्याला आरामही मिळतो. हे जेड रोलर म्हणजे नेमके काय? ते कसे वापरावे ? त्याचे फायदे काय याविषयी अधिक माहिती घेऊयात(What Is a Jade Roller ? Skin Benefits & How to Use).

जेड रोलर म्हणजे नेमके काय ? 

‘जेड रोलिंग’ ही एक चिनी ब्यूटी रिच्युअल आहे आणि तिथे ते पूर्वापार वापरलं जातं. कोरियन ब्यूटी टूल्समध्येही हे रोलर्स सापडतात. ‘जेड’ हा हिरव्या रंगाचा एक मौल्यवान खडा असतो. परंतु ‘क्वार्टझ्’ या गुलाबीरंगी मौल्यवान खड्यापासून बनवलेले रोलर्ससुद्धा बाजारात दिसतात. 'जेड रोलर' हे एक प्रकारचे चेहर्याचे सौदर्यं वाढविण्यासाठी आवश्यक असलेले मालिश साधन आहे. जुन्या चायनीज पद्धतीने ते बनवले जाते असे म्हणतात. जेड स्टोनमध्ये त्वचेला बरे करण्याचे गुणधर्म असल्याचे मानले जाते. असे बहुतेक रोलर्स नेपर्ट जेडपासून बनवलेले असतात, जे चेहरा स्वच्छ करण्याव्यतिरिक्त त्वचेतील रक्ताभिसरण सुधारतात. हे वापरण्यास अतिशय सोपे असते. हे फक्त हातात धरा आणि चेहऱ्याच्या त्वचेवर फिरवा. रोज असे केल्याने त्वचेला अनेक फायदे होतात.

घरच्याघरी १००% शुद्ध कोरफड जेल बनवायची सोपी कृती, ३ स्टेप्स - महागड्या जेलची गरजच नाही...

जेड रोलर नेमके वापरावे कसे ? (How To Use A Jade Roller For Skincare).

बाजारात अनेक प्रकारचे फेस जेड रोलर उपलब्ध आहेत. हे जेड रोलर त्वचेवर वापरणे अगदी सोपे आहे. सर्वप्रथम, आपल्या त्वचेवर थोडे तेल किंवा मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर, रोलर त्वचेवर हळुवार फिरवा, हे फिरवत असताना खालून वरच्या दिशेने फिरवा. हलक्या हाताने याचा वापर करावा. जास्त दाबाने वापरू नये. आपण याचा रोज वापर करु शकता. सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ४ ते ५ मिनिटे याचा वापर करावा. यामुळे त्वचेवरील ताण कमी होतो आणि आराम मिळतो.

भरीव-दाट-रेखीव भुवयांसाठी खास उपाय, खोबरेल तेल आणि कलौंजी- भुवया होतील अतिशय सुंदर

स्किन स्पेशालिस्ट सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत, केसगळती - पांढरे केस समस्याच संपतील...

जेड रोलर त्वचेसाठी वापरण्याचे फायदे :- 

१. जेव्हा आपण आपल्या त्वेचेसाठी एखादे क्रिम किंवा लोशन यांसारखे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतो, तेव्हा ते त्वचेत जितके खोलवर शोषले जातात तेव्हाच त्यांचा फायदा होतो. चेहऱ्यावर ब्यूटी प्रॉडक्ट्स लावून त्यानंतर या जेड रोलरने मसाज केल्यास हे ब्यूटी प्रॉडक्ट्स त्वचेत अधिक मुरण्यास मदत होते. 

२. जर काही कारणास्तव आपली त्वचा सुजलेली असेल किंवा फुगीर चेहऱ्याची समस्या असेल तर जेड रोलर वापरल्याने सूज कमी होऊ शकते. याने त्वचेला मसाज केल्याने आपला मूडही सुधारतो. याचबरोबर यामुळे चेहऱ्यावरची छिद्र अधिक घट्ट होतात.

नवरात्रात सुंदर दिसावं म्हणून चेहऱ्याला ब्लिच करताय ? ६ गोष्टी विसरु नका, चेहरा व्हायचा खराब...  

३. जेड रोलर वापरल्याने त्वचेला नैसर्गिक चमक प्राप्त होते. त्वचेवर उपस्थित असलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

४. हे सौंदर्य साधन आपल्या चेहऱ्यावरची वृद्धत्वाची लक्षणे देखील बर्‍याच प्रमाणात दूर करते. जेड रोलरमध्ये काही खास वैशिष्ट्ये आहेत जी लूज पडलेली  त्वचा अधिक घट्ट करतात. त्वचेची लवचिकता संतुलित करते. त्वचेवरील बारीक रेषा आणि वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्यात हे प्रभावी ठरू शकते. याच्या वापराने, लहान वयातच जर आपल्या त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसत असतील तर ती नाहीशी करण्यास मदत करते. 

५. रात्री झोपण्यापूर्वी आपण जेड रोलर वापरू शकता. याने त्वचेला मसाज केल्याने त्वचेच्या स्नायूंना आराम मिळतो. त्वचा मुक्तपणे श्वास घेऊ शकते. याचबरोबर याच्या वापराने त्वचेवरील डाग आणि मुरूम, पुटकुळ्यांपासून देखील मुक्तता मिळू शकते.

Web Title: WHAT IS A JADE ROLLER & HOW TO USE, 5 Benefits of Using A Jade Roller, What Is a Jade Roller? Skin Benefits & How to Use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.