सध्या कोरियन महिलांची काचेसारखी स्वच्छ, नैसर्गिक चमकणारी त्वचा सगळ्यांनाच भुरळ घालते. ही चमक मिळवण्यासाठी अनेक जण महागड्या क्रीम्स, सिरम्स आणि ट्रीटमेंट्सवर हजारो रुपये खर्च करतात.(Korean glow skin) कोरियन स्किन म्हणजे फक्त गोरी त्वचा नव्हे तर स्वच्छ, निरोगी, हायड्रेटेड आणि आतून चमकणारी त्वचा असायला हवी. कोरियामध्ये सौंदर्याची संकल्पना मेकअपपेक्षा स्किन हेल्थवर जास्त लक्ष देणारी आहे.(Korean skincare routine) त्यामुळेच कोरियन लोक फाउंडेशन वापरण्याऐवजी त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर दिसेल यावर भर देतात.(Glass skin formula)
कोरियन ग्लोचा गुपित मंत्र प्रॉडक्ट्समध्ये नाही तर त्वचा स्वच्छ ठेवण्याच्या योग्य पद्धतीवर अवलंबून आहे. या फॉर्म्युलाला ४-२-४ असं म्हणतात. जो कोरियन महिला वर्षानुवर्ष त्याचा उपयोग करत आहे. आपल्यालाही कोरियन महिलांसारखा ग्लो हवा असेल तर हा नियम नक्की फॉलो करा.
२० रुपयांचा देसी उपाय, रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटात केसांना लावलं की कोंडा-केस गळणं बंद
४-२-४ कोरियन स्किन केअर नियम
कोरियन स्किन केअर रुटीनसाठी अगदी १० मिनिटे लागतात. पहिले चार मिनिटे तेलाच्या क्लिन्सरने चेहऱ्यावर मालिश करायला हवे, ज्यामुळे मेकअप आणि तेल विरघळते. त्यानंतर दोन मिनिटे पाण्यावर आधारित क्लीन्सर (फोम किंवा जेल) वापरून उर्वरित अशुद्धता काढून टाकली जाते. नंतर चार मिनिटे स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. हे केवळ वरवरच नव्हे तर खोलवर त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते.
1. डबल क्लींजिंग हे त्वचेतून वॉटरप्रूफ मेकअप, सनस्क्रीन आणि सेबम सहजपणे रबिंगशिवाय काढून टाकतात. डबल क्लींजिंगमुळे चेहऱ्यावरील धूळ निघण्यास मदत होते. यामुळे त्वचेवरील छिद्र ओपन होतात, ज्यामुळे सीरम किंवा मॉइश्चरायझर चांगल्या प्रकारे शोषला जातो. ही प्रक्रिया त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
2. कोरड्या त्वचेवर क्लींजिंग ऑइल लावा आणि ४ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. मेकअप किंवा सनस्क्रीन असलेल्या भागांवर हे लावल्यास सेबम वितळेल, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होईल.
3. फोमिंग फेस वॉश लावा आणि उरलेली घाण आणि तेल काढून टाकण्यासाठी २ मिनिटे गोलाकार हालचालीत मालिश करा.
4. पहिले २ मिनिटे कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. त्यानंतर २ मिनिटे थंड पाण्याने स्वच्छ धुवा, ज्यामुळे छिद्रे घट्ट होतात आणि त्वचा ताजी राहते.
