Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाभीमध्ये तेल टाकून त्वचा चमकदार होते की नाही, कोणतं तेल ठरेल बेस्ट? पाहा कसा कराल वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:17 IST

Oil in Navel : नाभीमध्ये तेल टाकल्याने त्वचा चमकदार होते का किंवा आरोग्याला कोणते फायदे मिळतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं उत्तर या लेखात आपल्याला मिळेल.

Oil in Navel : नाभी हा आपल्या शरीराचा सेंटर पॉइंट मानला जातो. येथे त्वचा खूप पातळ असते आणि तिच्या मागे अनेक बारीक नसांचं जाळं असतं. त्यामुळे नाभी तेल पटकन शोषून घेते आणि त्याचा परिणाम दिसू लागतो. मात्र, हा कोणताही जादूई उपचार किंवा प्रत्येक आजाराचं औषध नाही. पण त्वचा मऊ ठेवण्यासाठी आणि शरीराला रिलॅक्स वाटण्यासाठी हा एक सोपा उपाय मानला जातो. चला तर मग, तुमच्या गरजेनुसार कोणते तेल योग्य ठरू शकते ते जाणून घेऊया.

1. एरंडेल तेल

जर तुमची त्वचा खूप कोरडी राहत असेल किंवा पोट जड वाटत असेल, तर एरंडेल तेल उपयोगी ठरू शकतं. हे तेल थोडे घट्ट असतं. रात्री नाभीत २ थेंब टाकल्यास त्वचेला आतून मॉइश्चर मिळण्यास मदत होते. कोरडेपणा कमी करण्यासाठी हे प्रभावी मानलं जातं.

2. खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याचं तेल जवळपास प्रत्येक घरात सहज मिळते. व्हर्जिन कोकोनट ऑइल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य मानलं जातं. टाइट कपडे किंवा घामामुळे नाभीजवळ जळजळ किंवा खाज येत असेल, तर खोबऱ्याचं तेल आराम देऊ शकतं. याचा हलका सुगंधही शांत झोपेसाठी मदत करू शकतो.

3. तीळ तेल

हिवाळ्यात तीळाचं तेल अधिक फायदेशीर मानलं जातं. हे तेल थंडीत उबदार असतं, जे शरीराला आतून उष्णता देतं. स्नायूंमध्ये ताण किंवा पोटाभोवती कडकपणा जाणवत असेल, तर थोडं कोमट तीळ तेल नाभीत लावल्याने आराम मिळू शकतो.

4. बदाम तेल

त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी बदाम तेल उत्तम पर्याय मानलं जातं. यामध्ये व्हिटामिन-ई भरपूर प्रमाणात असतं. संवेदनशील त्वचेसाठी हे तेल सुरक्षित मानलं जातं. नियमित वापरामुळे त्वचा मऊ राहण्यास आणि जुन्या खुणा हलक्या होण्यास मदत होऊ शकते.

5. मोहरीचं तेल

पूर्वीपासून नाभीत मोहरीचं तेल लावण्याची पद्धत आहे. हे ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास आणि शरीरातील सुस्ती कमी करण्यास मदत करतं, असं मानलं जातं. मात्र, हे तेल थोडं स्ट्रॉंग असतं. त्यामुळे संवेदनशील त्वचा असल्यास ते थेट न लावता दुसऱ्या तेलात मिसळून वापरलं तर चांगलं.

तेल कसं लावाल?

तेल लावण्यापूर्वी नाभी स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आत घाण जाऊ नये. फक्त २-३ थेंब तेल पुरेसं असतं, जास्त तेल टाकण्याची गरज नसते. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते, त्यामुळे परिणाम दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Navel oil for glowing skin: Which oil is best and how?

Web Summary : Applying oil to the navel can moisturize skin and relax the body. Castor, coconut, sesame, almond, and mustard oils each offer unique benefits. Clean the navel before applying 2-3 drops for best results.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स