Join us

रात्री झोपताना दुधात हा पदार्थ मिसळून प्या; चेहऱ्यावर ग्लो येईल-झोपही शांत लागेल, ५ फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:40 IST

Drink Milk Mixed With Ghee At Night Know Its Benefits : दुधात तूप मिसळून प्यायल्यानं त्वचेला बरेच फायदे मिळतात.

रात्री झोपण्याआधी दुधात 1 चमचा तूप मिसळून पिण्याची परंपरा जुनी असून आरोग्याचा खजिना आहे. दूध आणि तुपाचे मिश्रण शरीरासाठी बरेच फायदेशीर ठरते. हे एक शक्तीशाली आणि पौष्टीक मिश्रण आहे ज्यामुळे तब्येतीला बरेच फायदे मिळतात. दुधात तूप मिसळून प्यायल्यानं शरीराला काय काय फायदे मिळतात समजून घेऊ.

रात्री झोपताना दुधासोबत काहीजण हळद घेतात तर काहीजण नुसतं दूध घेतात. साधं दूध घेण्याऐवजी त्यात तूप घातल्यास त्वचेला बरेच फायदे मिळतात. दुधासोबत तुपाचे सेवन केल्यानं शरीराला काय काय फायदे मिळतात समजून घेऊ.  (What Happens If You Drink Milk Mixed With Ghee At Night Know Its Benefits)

पचन चांगले होते

तुपासोबत गरम दूध प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते. कारण तुपातील ब्युटीरिक एसिड आतड्यांतील सूज कमी करते. याशिवाय निरोगी बॅक्टेरियाजच्या वाढीस उत्तम ठरते. मल त्याग करणंही सोपं जातं. गॅसेसच्या समस्येपासूनही आराम मिळतो. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. 

मेटाबॉलिझ्म चांगला राहतो

गरम दुधात तूप मिसळून प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. कारण तुपातील मीडियम चेन ट्रायग्लिसराईड्स मेटाबॉलिझ्म वाढवतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

सांधेदुखीची समस्या कमी होते

जर सांध्यांमध्ये वेदना होत असतील तर तुपासोबत एक कप गरम दूध प्यायल्यास आराम मिळते. तुपात ओमेगा-3 फॅटी एसिड्स असतात. ज्यामुळे सूज कमी होण्यास, सांधेदुखीची समस्या टळण्यास मदत होते. 

त्वचा ग्लोईंग दिसते

दुधात तूप मिसळून प्यायल्यानं त्वचेला बरेच फायदे मिळतात. तुपात व्हिटामीन ए, डी, ई, के यांसारखे गुण असतात जे त्वचेसाठी आवश्यक ठरतात. व्हिटामीन त्वचेला आतून पोषण देते आणि मॉईश्चर टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे त्वचेला नैसर्गिक, प्राकृतिक चमक मिळते. 

झोप चांगली लागते

आजकाल बऱ्याचजणांना झोप न येण्याची समस्या उद्भवते.  कितीही थकवा आला असेल तरी शांत झोप येत नाही. झोपण्याआधी  तूप गरम दुधासोबत प्यायल्यानं झोपेची गुणवत्ता सुधारते. दूध आणि तूप दोन्हीमध्ये ट्रिप्टोफॅन असते जे एमिनो एसिड झोप येण्यासाठी गुणकारी ठरते. दुधाची उष्णता   शरीर आणि मनाला आराम देण्यास मदत करते. ज्यामुळे झोप लागणं सोपं होतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Drink milk with ghee before sleep; get glowing skin, sound sleep.

Web Summary : Drinking milk with ghee before bed aids digestion, boosts metabolism, reduces joint pain, improves skin glow due to vitamins, and promotes sound sleep by relaxing the body and mind.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी