What Deficiency Causes Dark Lips : बऱ्याच महिलांना ओठ काळे होण्याची समस्या होत असते. महिलाच काय पुरूषांना देखील ही समस्या होते. यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य तर कमी होतंच, सोबतच आत्मविश्वासही कमी होतो. ओठ काळे होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. यात जेनेटिक्स, ओठांवर सनस्क्रीनचा वापर न करणं, जास्त स्मोकिंग करणं, ड्राय ओठांवर जीभ फिरवमे, लिंब बामध्ये मिंथॉल किंवा कापूर असेल तर ही समस्या होऊ शकते. पण काही लोकांच्या शरीरात काही गोष्टी कमी असल्यामुळेही ओठ काळे होतात. Onlymyhealth च्या एका रिपोर्टमध्ये न्यूट्रिशनिस्ट अर्चना जैन यांनी याची कारणं सांगितली आहेत.
कशामुळे काळे होतात ओठ?
व्हिटामिन बी१२ ची कमतरता
शरीरात व्हिटामिन बी १२ ची कमतरता झाली तर रेड ब्लड सेल्सचं उत्पादन कमी होतं आणि तंत्रिका तंत्रासंबंधी समस्या होऊ शकतात. अशात ओठ काळे होऊ लागतात. तसेच त्वचेवर डागही येऊ शकतात. व्हिटामिन बी १२ मिळवण्यासाठी डेअरी प्रॉडक्ट्सचा आहारात समावेश करा.
आयर्नची कमतरता
शरीरात आयर्नची कमतरता झाल्यावर रक्तात ऑक्सीजनचा फ्लो कमी होतो, ज्यामुळे ओठांमध्येही ऑक्सीजन कमी येणे आणि मेलानिनच्या उत्पादन निर्मितीत बदल होऊ शकतो. यामुळे लोकांच्या शरीरात अॅनिमियाची समस्या होऊ शकते. ज्यामुळे लोकांच्या ओठांच्या रंगात बदल येणे आणि रंग काळा होणे अशा समस्या होऊ शकतात.
झिंकमध्ये कमतरता
शरीरात जर झिंक कमी झालं तर लोकांचे ओठ कोरडे होतात, ओठ फाटतात, ओलावा कमी होतो, काळे पडतात किंवा याच्या रंगात बदल होण्याची समस्या होते. झिंक कमतरता भरून काढण्यासाठी कडधान्य, नट्स, सीड् आणि डेअर उत्पादनांचा डाएटमध्ये समावेश करा.
फोलेटची कमतरता
शरीरात फोलेटची कमतरता झाल्यावर ओठ काळे होण्याची समस्या होऊ शकते. शरीरात हे कमी झाल्यावर म्यूकोलस ऊतकं आणि त्वचा प्रभावित होते. ज्यामुळे ओठांवर पिगमेंटेशनची समस्याही होते. सोबतच लोकांच्या तोंडात फोडही होऊ शकतात. याची कमतरता दूर करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि आंबट फळं खावीत.
शरीरात पाणी झाल्यावर
शरीरात पाणी कमी झालं तर त्वचा ड्राय होते आणि ओठही ड्राय होऊ लागतात. अनेकदा ओठ ड्राय झाल्यावर लोक त्यावरून जीभ फिरवतात. ज्यामुळे ओठांमध्ये पिगमेंटेशनची समस्याही होते.
लाइफस्टाईलसंबंधी समस्या
अनेकांना स्मोकिंग करण्याची सवय असते किंवा जास्त कॅफीन घेण्याची सवय असते. तसेच बरेच लोक सनस्क्रीनचा वापर करत नाहीत. लाइफस्टाईलसंबंधी या समस्यांमुळेही ओठ काळे पडण्याची समस्या होते. अशात ओठांचा काळा रंग दूर करण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये बदल करावा.