Face Pimples Health Signals: झोपेतून उठल्या आणि आरशात पाहिल्यावर चेहऱ्यावर मोठाले पिंपल्स दिसणं म्हणजे कोणत्याही तरूणी किंवा महिलांसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखे असतात. अचानक चेहऱ्यावर येणारे हे पिंपल्स सौंदर्याचे तीनतेरा वाजवतात. चेहरा तर खराब दिसतोच सोबतच त्यांचं ठणकणं देखील वैगात देतं. मग काय लगेच पिंपल्स दूर करण्यासाठी महागडी ब्युटी प्रॉडक्ट्स वापरली जातात, तसेच घरगुती उपायही करून पाहतात. पण तुम्हाला माहीत आहे का की चेहऱ्यावर येणारे पिंपल्स ही फक्त स्किन किंवा सौंदर्याची समस्या नसून, ते शरीराच्या आत काय बिघाड झालाय हेही दर्शवतात.
अलीकडेच प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर राज शमानी यांनी त्यांच्या bestofrajshamani या इन्स्टाग्राम पेजवर एक पॉडकास्ट शेअर केला. या पॉडकास्टमध्ये त्यानी सांगितले की, चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवर येणारे पिंपल्स शरीरात सुरू असलेल्या काही समस्यांचे संकेत देऊ शकतात. चला तर जाणून घेऊया, चेहऱ्यावर कुठे पिंपल्स येणे कोणत्या अवयवांच्या त्रासाकडे इशारा करते.
गालाच्या वरच्या भागावर पिंपल्स
तज्ज्ञांच्या मते, गालाच्या वरच्या भागावर वारंवार पिंपल्स येत असतील, तर याचा अर्थ पोट रोज नीट साफ होत नसावं. बद्धकोष्ठता, अपचन किंवा पचनसंस्थेतील बिघाडामुळे असे पिंपल्स दिसू शकतात. अशावेळी पोटाच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
गालांच्या मधोमध पिंपल्स
जर गालांच्या अगदी मधोमध पिंपल्स येत असतील, तर हे फुफ्फुसांशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतात. धूळ, प्रदूषण किंवा फुफ्फुसांचे आजार यामागचे कारण असू शकतात. अशा वेळी वेळीच सावध होणे आवश्यक आहे.
हनुवटीवर पिंपल्स
हनुवटीवर वारंवार पिंपल्स येणे हे युटेरस किंवा हार्मोनल असंतुलनाचे संकेत असू शकते. खासकरून महिलांमध्ये हार्मोन्समधील बदलांमुळे या भागात पिंपल्स येणे सामान्य आहे.
नाकाच्या टोकावर पिंपल्स
नाकाच्या टोकावर येणारे पिंपल्स हे हृदयाशी संबंधित समस्यांकडे इशारा करतात. राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये तज्ज्ञांनी सांगितले की त्यांच्या वडिलांच्या नाकावर जवळपास एक वर्ष पिंपल्स येत होते आणि नंतर मल्टिपल ब्लॉकेजमुळे त्यांना ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. त्यामुळे नाकाच्या टोकावर पिंपल्स येणे ही हृदयविकाराचे संकेत असू शकतात.
डोळ्यांच्या खाली पिंपल्स
डोळ्यांच्या खाली पिंपल्स किंवा सूज येणे हे किडनी किंवा लिव्हरशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतात. रात्री दारू पिणे, अनहेल्दी आहार आणि पाण्याची कमतरता यामुळेही अंडर-आय पफीनेस आणि पिंपल्स दिसू शकतात.
कपाळाच्या मधोमध पिंपल्स
कपाळाच्या मध्यभागी पिंपल्स येणे हे लिव्हरच्या समस्येचे लक्षण असू शकते. लिव्हर नीट डिटॉक्स करू शकत नसेल, तर त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. जर या भागात पिंपल्स दीर्घकाळ टिकून राहिले, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पिंपल्सकडे दुर्लक्ष का करू नये?
चेहऱ्यावरचे पिंपल्स केवळ त्वचेसंबंधी समस्या नसतात. ते शरीरातील अंतर्गत आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात. जर एकाच जागी वारंवार पिंपल्स येत असतील, तर तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. खासकरून नाकावर सतत पिंपल्स येणे हे हृदयविकाराचा इशारा ठरू शकतो, त्यामुळे ते हलक्यात घेऊ नये.
पिंपल्स कमी करण्यासाठी सोपे उपाय
संतुलित आहार घ्या – हिरव्या भाज्या, फळे आणि भरपूर पाणी प्या.
स्किनची काळजी घ्या – दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ ठेवा.
दारू आणि जंक फूडचे सेवन कमी करा.
ताणतणाव कमी करा – मेडिटेशन, योगामुळे हार्मोनल संतुलन सुधारतं.
नियमित आरोग्य तपासणी करून घ्या – वारंवार एकाच ठिकाणी पिंपल्स येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
