उन्हाळ्यात, घाम, तेलकटपणा आणि उष्णतेमुळे त्वचा काळवंडते आणि तिची चमकही कमी होते. अशावेळी आपण त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स, महागड्या ट्रिटमेंट्स (Watermelon Peel Face Pack Skin Benefits) करून घेतो. परंतु त्यांचा रासायनिक परिणाम त्वचेला हानी (Simple Way To Use Watermelon Peel For Skin) पोहोचवू शकतो. यासाठीच, त्वचेवर आपण काही खास (Watermelon Peel Face Mask) नैसर्गिक उपाय आजमावून पाहू शकतो. उन्हाळ्यात कलिंगड खाऊन त्याच्या साली फेकून देण्याऐवजी त्वचेसाठी एक उत्तम नॅचरल फेसमास्क घरीच तयार करु शकतो(Beauty Benefits Of Watermelon Peel For Skin).
कलिंगड जितके पौष्टिक असते तितकेच त्याच्या सालीतही त्वचेसाठी आवश्यक औषधी गुणधर्म असतात. यामुळेच उन्हाळ्यात त्वचेसाठी कलिंगची सालं म्हणजे वरदानच म्हणावे लागेल. कलिंगडाच्या सालीत भरपूर पाणी, व्हिटॅमिन ए, सी, बी६ आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे चेहऱ्यावरील सूज, जळजळ आणि पुरळ कमी करतात. यासाठीच, उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्यावर साली फेकून देण्यापेक्षा त्याचा फेसमास्क करुन चेहऱ्यावर लावल्याने अनेक फायदे मिळतात. हा फेसमास्क टॅनिंग काढून टाकण्यास, त्वचेला हायड्रेट ठेवण्यास आणि नैसर्गिक चमक येण्यास मदत करतो.
साहित्य :-
१. कलिंगडाची सालं - १ कप
२. गुलाबपाणी - गरजेनुसार
३. चंदन पावडर - १ टेबलस्पून
४. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून
कलिंगडाच्या सालींचा फेसमास्क कसा करायचा ?
सगळ्यात आधी कलिंगडाच्या सालींला जो वरवरचा पांढरा भाग असतो तो काढून एका वेगळ्या बाऊलमध्ये ठेवावा. आता यात गरजेनुसार गुलाबपाणी घालून हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये एकत्रित वाटून त्याची पातळ पेस्ट करून घ्यावी. ही मिक्सरमधील तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून चंदन पावडर आणि एलोवेरा जेल मिसळून घ्यावे. कलिंगडाच्या सालींचा फेसमास्क तयार आहे.
दह्यात चमचाभर 'हे' पीठ कालवून खा! त्वचा दिसेल तरुण - चेहऱ्यावरुन ओळखताच येणार नाही तुमचं वय...
उन्हाळ्याच्या दिवसांत, कलिंगडाच्या सालींचा फेसमास्क आठवड्याभरातून २ ते ३ वेळा चेहऱ्यावर लावू शकता. हा फेसमास्क सकाळच्यावेळी चेहऱ्यावर लावणे अधिक फायदेशीर ठरेल. ज्यांची स्किन ऑयली आहे त्यांनी चंदन पावडर तर कोरडी त्वचा असेल तर या फेसमास्कमध्ये एलोवेरा जेल मिसळून लावावे.
फेसमास्क सुकल्यानंतर, कोमट किंवा साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्वचा घासून धुवू नये यामुळे त्वचेची जळजळ होऊन लालसरपणा येऊ शकतो. फेसमास्क काढल्यानंतर किमान अर्धा तास तरी उन्हांत बाहेर जाऊ नका. फेसमास्क काढल्यानंतर, त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी हलके मॉइश्चरायझर लावा.
हा फेसमास्क लावण्याचे फायदे...
१. कलिंगडाच्या सालींचा फेसमास्क त्वचेला खोलवर हायड्रेशन देतो आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत होते.
२. या फेसमास्कमध्ये असलेले व्हिटॅमिन 'सी' त्वचेची दुरुस्ती करते आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते.
३. कलिंगडाची सालं त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि त्वचेची छिद्र स्वच्छ करते.
४. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेवरील पुरळ कमी करतात आणि त्वचा आतून स्वच्छ ठेवतात.