Join us

मालकाला बघताच बकऱ्यांनी केली बेशुद्ध पडण्याची एक्टिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 15:14 IST

Watch funny video goats dramatic reaction : साध्या दिसणाऱ्या बकऱ्यांच्या मजेदार हालचाली पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओज तुफान हसवतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बकरीची नाटकं पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरलं जाणार नाही. या व्हिडिओमध्ये  ट्रकमध्ये मालकाला पाहून बकऱ्यां बेशुद्द पडण्याचं नाटक करतात. (Watch funny video goats dramatic reaction of fainting on seeing parcel truck will make you laugh)

साध्या दिसणाऱ्या बकऱ्यांच्या मजेदार हालचाली पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल की रस्त्याच्या कडेला हिरवळ दिसत आहे, ज्यामध्ये काही शेळ्या आनंदाने चरताना दिसत आहेत.  दरम्यान तेथे एक पार्सल ट्रक येतो. व्हिडीओ पाहून असे दिसते की, ट्रकमध्ये बसलेल्या मालकाला पाहून बकऱ्या बेशुद्ध होण्याचे नाटक करत आहेत.

 भयंकर! मालकिणीनं पिंजऱ्याचं दार उघडताच अजगरानं हातच चावला; व्हिडिओ पाहून फुटेल घाम

हा व्हिडिओ खरोखरच मजेशीर आहे. 'व्हायरल हॉग' या ट्विटर हँडलवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनाही खूप हसायला आलं.  या व्हिडिओला आतापर्यंत 58.8K व्ह्यूज मिळाले आहेत, तर व्हिडिओवर लाईक्स, कमेंट्सची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. हा व्हिडीओ खूप पाहिला जात आहे आणि खूप पसंत केला जात आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल