Join us

महागड्या फेसवॉशऐवजी तांदळाच्या पाण्याने धुवा चेहरा, मग बघा या नॅचरल उपायाची कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:29 IST

Rice Water For Skin : अनेक ब्युटी एक्सपर्ट्स हा नॅचरल उपाय नियमितपणे करण्याचा सल्ला देत असतात. अशात चला जाणून घेऊया तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने काय फायदे होतात. 

Rice Water For Skin :  भात आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असतो. भरपूर लोक जेवण करताना भात खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तांदळाचे आपल्या त्वचेला देखील भरपूर फायदे मिळतात. तांदळाच्या पाण्यात असे पोषक तत्व आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे त्वचेला हेल्दी आणि चमकदार बनवतात. अनेक ब्युटी एक्सपर्ट्स हा नॅचरल उपाय नियमितपणे करण्याचा सल्ला देत असतात. अशात चला जाणून घेऊया तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने काय फायदे होतात. 

तांदळाच्या पाण्याची खासियत

तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, मिनरल्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास, डाग दूर करण्यास आणि नॅचरल ग्लो देण्यास मदत करतात. त्याशिवाय यातील फेरूलिक अ‍ॅसिड आणि एलांटोइन तुमच्या त्वचेचा सूर्याच्या नुकसानकारक किरणांपासून बचाव करतात. 

तांदळाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे

- नियमितपणे तांदळाच्या पाण्याचे चेहरा धुतल्याने त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. या पाण्याची आणखी एक खासियत म्हणजे याचे काहीही साइड इफेक्ट्स नाहीत.

- तांदळाच्या पाण्याने डेड स्किन सेल्स दूर करण्यास मदत मिळते. असं केल्याने त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते.

- तांदळाच्या पाण्याने नेहमीच चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटेशन हलकं होण्यास मदत मिळते.

- तांदळाच्या पाण्यात असलेल्या अ‍ॅंटी-इन्फेलेमेटीर गुणांमुळे त्वचेवरील लालसरपणा आणि एक्ने शांत केली जातात.

तांदळाच्या पाण्याचा कसा कराल वापर?

तांदळाचं पाणी तयार करण्यासाठी एक कप तांदूळ दोन कप पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून एका भांड्यात काढा. सकाळी आणि रात्री या पाण्याने चेहरा धुवावा. ५ ते १० मिनिटे हे पाणी चेहऱ्यावर तसंच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. चांगल्या परिणामांसाठी रोज दिवसातून दोन वेळा या पाण्याने चेहरा धुवावा. 

काय काळजी घ्याल?

जर तुमची त्वचा सेंसिटिव्ह असेल तर आधी पॅच टेस्ट करा. काही इन्फेक्शन होत नसेल तरच या पाण्याने चेहरा धुवावा. तसेच आधी करून ठेवलेल्या पाण्याचा वापर करू नये. रोज ताजं पाणी तयार करा. हे पाणी चेहऱ्यावर जास्त लावून ठेवू नका.  

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स