Join us

इंस्टेंट ग्लो हवाय? कोरफडीच्या गरात मिक्स करून लावा 'या' दोन गोष्टी, लगेच दिसून येईल फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:43 IST

What to Mix with Aloe Vera for Face: कोरफडीच्या गरात काय मिक्स करून लावल्यास त्वचेला अधिक फायदा मिळेल?

What to Mix with Aloe Vera for Face: त्वचेची आतून सफाई करण्यासाठी म्हणा, त्वचा मुलायम करण्यासाठी म्हणा किंवा चमकदार करण्यासाठी म्हणा अशा इतरही अनेक फायद्यांसाठी कोपरफडीच्या गराचा वापर केला जातो. कोरफडीच्या गरामध्ये त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असे अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेवरील अनेक समस्या दूर करतात. तसेच अ‍ॅलोव्हेरा जेलमध्ये म्हणजेच कोरफडीच्या गरात मॉइश्चरायझिंग गुणधर्मही आहेत, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो. तसेच यानं त्वचेवरील डाग आणि मुरुम कमी करण्यात मदत मिळते.

कोरफड आणि गुलाबजल

कोरफडीच्या गरात गुलाबजल घालून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला हायड्रेशन मिळतं. गुलाबजलानं त्वचेची पीएच लेव्हल संतुलित राहते. हे मिश्रण त्वचेला नॅचरल ग्लो देतं आणि डागही कमी करतं.

कसं लावाल?

२ चमचे कोरफडीचा गर घ्या आणि त्यात गुलाबजल मिस्क करा. हे चेहऱ्यावर लावून अर्धा तास ठेवा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक आठवड्यातून २-३ वेळा किंवा दररोज रात्री झोपण्यापूर्वी लावू शकता.

कोरफड आणि लिंबाचा रस

जर चेहऱ्यावर डाग किंवा चट्टे असतील, पिग्मेंटेशन असेल तर कोरफडीचा गर आणि लिंबाचा रस उपयोगी ठरतो. लिंबामध्ये व्हिटामिन C असतं, जे त्वचा उजळ करतं. हे मिश्रण त्वचेला चमकदार बनवतं आणि रंगतही सुधारते.

कसं लावाल?

2 चमचे कोरफडीचा गर घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तास ठेवा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक सकाळी किंवा दिवसा वापरावा. मात्र लिंबाचा रस जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नका.

English
हिंदी सारांश
Web Title : Instant glow: Mix these two ingredients with aloe vera.

Web Summary : Aloe vera hydrates and brightens skin. Combine with rose water for pH balance and reduced blemishes. Mix with lemon juice for lightening dark spots. Use regularly for best results.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स