Join us
Daily Top 2Weekly Top 5

लिंबू-बिब्बा-सोडा-टूथपेस्ट, व्हायरल उपाय पाहून अनेकींचे भाजले चेहरे-तुम्ही पण करताय का असं काही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 18:29 IST

Viral Home Remedies ; before trying anything on your skin be careful, never try these remedies at home without asking experts : काही घरगुती उपाय सगळ्यांनाच जमतात असे नाही. पाहा काय करावे.

घरगुती उपाय हे सहज उपलब्ध आणि नैसर्गिक असल्यामुळे लोक त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. हे उपाय नक्कीच फायद्याचे आणि सोयीस्कर असतात. (Viral Home Remedies ; before trying anything on your skin be careful, never try these remedies at home without asking experts)पण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, तिची संवेदनशीलता वेगळी असते, त्यामुळे एकाच उपायाचा परिणाम सगळ्यांवर सारखा होईलच असे नाही. काही वेळा हेच उपाय उलट त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे कोणताही उपाय आंधळेपणाने न वापरता समजून घेणे आणि मग करणे गरजेचे आहे.

लिंबाचा रस त्वचा उजळण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी वापरला जातो, पण तो खूप आम्लीय असल्यामुळे काही लोकांच्या त्वचेसाठी त्रासदायक ठरतो. लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते. विशेषतः उन्हाळ्यात लावून बाहेर गेल्यास त्वचा अधिक संवेदनशील होते. त्वचेवर लिंबू लावण्याआधी किंवा केसांना लावण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

बिब्बा हा पारंपरिक उपायांमध्ये काही ठिकाणी वापरला जातो, पण तो अतिशय तीव्र स्वरुपाचा असतो. चुकीच्या प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्यास त्वचेवर फोड, सूज तसेच उष्णतेचा त्रास होऊ शकतो. अनेकांना बिब्याची सवय नसते आणि सहन करता येत नाही. बेसन हे फेसपॅकमध्ये वापरले जाते, पण प्रत्येकाच्या त्वचेला ते सूट होईलच असे नाही. काहींच्या त्वचेला त्यामुळे कोरडेपणा वाढतो किंवा त्वचा ताणल्यासारखी वाटते. बेसनामुळे अनेकांच्या त्वचेवर पांढरे पॅच उठतात. त्यामुळे आध टेस्ट करा मगच उपाय करा.  

याशिवायही अनेक घरगुती उपाय सगळ्यांसाठी सुरक्षित नसतात. हळद जास्त प्रमाणात वापरल्यास काहींना खाज किंवा त्वचेवर डाग पडू शकतात. बेकिंग सोडा स्क्रब म्हणून वापरल्यास त्वचेचा नैसर्गिक समतोल बिघडू शकतो आणि त्वचा कोरडी होते. टूथपेस्ट पिंपल्सवर लावण्याची सवय अनेकांना असते, पण त्यामुळे जळजळ आणि कोरडेपणा वाढतो. अगदी कोरफड देखील काही वेळा सर्वांना सूट होत नाही आणि त्यामुळे खाज किंवा पुरळ येऊ शकतात. म्हणूनच घरगुती उपाय करताना नैसर्गिक आहे म्हणजे सुरक्षितच असा समज ठेवू नये. आपल्या त्वचेचा पोत ओळखून, थोड्या भागावर आधी चाचणी करुनच कोणताही उपाय वापरणे हेच योग्य आणि सुरक्षित ठरते.

English
हिंदी सारांश
Web Title : Viral Home Remedies: Be Cautious, They Can Harm Your Skin!

Web Summary : Home remedies aren't universally safe. Lemon, baking soda, toothpaste can cause burns, irritation, dryness. Test remedies on small skin areas first; consult experts.
टॅग्स :होम रेमेडीब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सत्वचेची काळजी