Join us

Vat Purnima 2025 Mehndi: वटपौर्णिमेला भली मोठी मेहेंदी काढायला वेळ नाही? पाहा १ ट्रिक, हातांवर सुरेख डिझाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 17:56 IST

Unique Alternatives To Mehendi Designs For Vat Purnima 2025: वटपौर्णिमेसाठी हातावर मेहेंदी काढायची आहे, पण ना घरात मेहेंदीचा कोन आहे ना मेहेंदी काढत बसायला वेळ.. बघा अशावेळी काय करावं...(what to do if you dont have time for applying mehendi on hands?)

ठळक मुद्देहात छान रंगतील आणि आपण मेहेंदी काढली नाही, ही खंतही मनातून जाईल. एकदा हा उपाय करून पाहा.

Easy Mehndi Design: वटपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यानंतर आता एकामागे एक सणवार सुरू होतातच. आता सण म्हटले की महिलांच्या हातावर मेहेंदी हवीच.. पण हल्ली बाजारात केमिकलयुक्त मेहेंदी मिळते. ती रंगून अगदी काळी होते, पण काही दिवसांतच तिचे पापुद्रे निघू लागतात. यावरूनच  तिच्यामध्ये किती जास्त केमिकल आहे ते दिसून येतं. अशी केमिकलयुक्त मेहेंदी अनेक जणींना सहन होत नाही. शिवाय बहुतांश महिलांना सणावाराच्या काळात एवढी जास्त कामं असतात की वेळ काढून मेहेंदी काढायला बसणं केवळ अशक्य असतं. वेळ असला तर घरात मेहेंदीचा कोन नसतो.. अशा अडचणी प्रत्येकीला कधी ना कधी येतातच. म्हणूनच आता अशी मेहेंदी बाबतची कोणतीही अडचण कधीही आली तरी हा एक मस्त उपाय पाहून ठेवा (best alternative for mehendi). यामध्ये अगदी झटपट तुमचे हात मेहेंदी काढल्याप्रमाणे लालचुटूक होतील आणि सण छान साजरा होईल.(what to do if you dont have time for applying mehendi on hands?)

केमिकलयुक्त मेहेंदी न वापरता घरच्याघरी हातांवर कशी नक्षी काढावी?

 

केमिकलयुक्त मेहेंदीला कोणता दुसरा उत्तम पर्याय असू शकतो, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ ai.gharelu_nuskhe या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

वटपौर्णिमेसाठी खास मेहेंदी डिझाइन्स, हातावर खुलणारा रंग आणि नात्यातला वाढता गोडवा...

हा उपाय करण्यासाठी ४ ते ५ विड्याची पानं घ्या, पानं स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांचे बारीक बारीक तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यात घाला.

 

आता त्यामध्येच १ टी स्पून हळद आणि अर्धा टीस्पून चुना घाला. आता हे तिन्ही पदार्थ मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्या.

कुरकुरणाऱ्या गुडघ्यांसाठी डॉ. श्रीराम नेने सांगतात खास औषध- म्हातारपणीही गुडघे राहतील दणकट

आता हे वाटण एखाद्या गाळणीने गाळून त्यातलं पाणी वेगळं काढून घ्या. या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढं कुंकू घालून ते व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता या मिश्रणाने तुमच्या हातावर हवी ती नक्षी काढा. हात छान रंगतील आणि आपण मेहेंदी काढली नाही, ही खंतही मनातून जाईल. एकदा हा उपाय करून पाहा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमहिलामेकअप टिप्सवटपौर्णिमा