Lokmat Sakhi >Beauty > टाचांना मोठ्या भेगा पडल्या-पावसाळ्यात ठणकतातही? कच्च्या बटाट्याचा उपाय- भेगांसाठी खास मलम...

टाचांना मोठ्या भेगा पडल्या-पावसाळ्यात ठणकतातही? कच्च्या बटाट्याचा उपाय- भेगांसाठी खास मलम...

No Dry, Cracked Heels. Rub a Potato Over Them : Recipe for smooth feet with potato remedy : Natural Home Remedies for Cracked Heels : Using potatoes for cracked heels : Remove Cracked Heels By Using potatoes : फुटलेल्या टाचा, कोरडी पडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी फक्त १ कच्चा बटाटा पुरेसा आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2025 17:55 IST2025-07-12T17:34:19+5:302025-07-12T17:55:09+5:30

No Dry, Cracked Heels. Rub a Potato Over Them : Recipe for smooth feet with potato remedy : Natural Home Remedies for Cracked Heels : Using potatoes for cracked heels : Remove Cracked Heels By Using potatoes : फुटलेल्या टाचा, कोरडी पडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी फक्त १ कच्चा बटाटा पुरेसा आहे...

Using potatoes for cracked heels No Dry, Cracked Heels. Rub a Potato Over Them atural Home Remedies for Cracked Heels | टाचांना मोठ्या भेगा पडल्या-पावसाळ्यात ठणकतातही? कच्च्या बटाट्याचा उपाय- भेगांसाठी खास मलम...

टाचांना मोठ्या भेगा पडल्या-पावसाळ्यात ठणकतातही? कच्च्या बटाट्याचा उपाय- भेगांसाठी खास मलम...

पायांच्या टाचांना भेगा पडणे ही महिलांमधील अगदी फारच कॉमन समस्या आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणींच्या पायांच्या टाचांना कायम वर्षाचे बाराही महिने भेगा पडलेल्या असतात. पायांवर दिसणाऱ्या या भेगा (No Dry, Cracked Heels. Rub a Potato Over Them) दिसताना तर वाईट दिसतातच पण सोबतच वेदनाही तितक्याच प्रचंड प्रमाणात होतात. इतकंच नव्हे तर काहीवेळा या भेगांमध्ये बाहेरील धूळ, घाण जाऊन त्वचेला वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते. टाचांना पडलेल्या भेगांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यातून रक्तही येऊ लागते. पायांच्या टाचांना (How to care for dry, cracked heels) भेगा पडल्यामुळे केवळ पायांचे सौंदर्यच (Remove Cracked Heels By Using potatoes) खराब होत नाही तर वेदना होऊन चालणे, बसणे इतकंच काय तर साधे उभे राहणे देखील कठीण होऊन जाते. 

अशा फुटलेल्या टाचांची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी एक घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतो. फुटलेल्या टाचांवर असरदार उपाय म्हणून आपण कच्च्या बटाट्याचा वापर (Using potatoes for cracked heels) करू शकतो. फुटलेल्या टाचा किंवा टाचांची कोरडी पडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी कच्च्या बटाट्याचा वापर नेमका कसा करावा ते पाहूयात. 

टाचांच्या भेगांसाठी कच्चा बटाटा कसा आहे फायदेशीर ? 

बटाट्यामध्ये असलेले पोषक घटक आणि त्यातील स्टार्च हे टाचांच्या भेगांसाठी फायदेशीर ठरतात. बटाट्यामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे कोरडी आणि फुटलेली त्वचा मऊ व हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले विटॅमिन - सी कोलेजनच्या निर्मितीस चालना देते, जे त्वचेची लवचिकता आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असते. तसेच, बटाट्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मही असतात, जे सूज आणि वेदना कमी करण्यात उपयुक्त ठरतात. जेव्हा आपण बटाट्याचा रस किंवा त्याचे तुकडे टाचांवर चोळून लावतो, तेव्हा त्यातील पोषक तत्त्वे थेट त्वचेत शोषली जातात, ज्यामुळे टाचांच्या भेगा कमी होऊन  त्वचा अधिक मऊ, नरम आणि निरोगी होऊ लागते.

भुवया आणि पापण्यांचे केस पांढरे व्हायला लागले? बोटावर ‘हे’ तेल घेऊन करा मसाज- पाहा जादू...

टाचांच्या भेगांसाठी कच्च्या बटाट्याचा वापर कसा करायचा... 

१. हलक्या गरम पाण्यांत मीठ घालून ते व्यवस्थित पाण्यांत विरघळवून घ्या. त्यानंतर या मिठाच्या पाण्यांत १० ते १५ मिनिटे पाय ठेवून बसा. १५ मिनिटानंतर फुट स्क्रबरने हलकेच चोळून टाचांच्या भागांचे स्क्रबिंग करुन घ्या. यामुळे टाचांवरील डेड स्किन निघून टाचा स्वच्छ होतील. मग कच्चा बटाटा बरोबर मधोमध कापून तो अर्धा बटाटा टाचेच्या भागांवर चोळून १० ते १५ मिनिटे मसाज करून घ्या. त्यानंतर अर्धा तास बटाट्याचा रस टाचांवर तसाच राहू द्यावा. अर्ध्या तासानंतर पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. पाय पुसून संपूर्णपणे कोरडे करुन मग खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलाने टाचांना मसाज करुन घ्यावा.   

बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

२. एक बटाटा उकडवून त्याची सालं काढून तो व्यवस्थित मॅश करुन घ्यावा. त्यानंतर एका बाऊलमध्ये मॅश केलेला बटाटा, चमचाभर मध व खोबरेल तेल घालून सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण चमच्याने कालवून त्याची स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यावी. पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून मगच त्यावर ही तयार पेस्ट लावावी. त्यानंतर ३० ते ४० मिनिटे ही पेस्ट टाचांवर तशीच ठेवून द्यावी. मग कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्यावेत. पाय संपूर्णपणे कोरडे करून त्यांना मॉइश्चराइजर किंवा फुट क्रीम लावून हलकेच मसाज करून घ्यावा. कच्च्या बटाट्याचे हे दोन्ही उपाय पायांच्या भेगांवर अतिशय असरदार ठरतात, यामुळे पायांच्या भेगांचे प्रमाण कमी होऊन आराम मिळतो.

Web Title: Using potatoes for cracked heels No Dry, Cracked Heels. Rub a Potato Over Them atural Home Remedies for Cracked Heels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.