दिवाळीच्या ३ दिवसांत आपली खूप धावपळ होत असते. त्याच्या आधीही बऱ्याच दिवसांपासून दिवाळीची कामं सुरूच असतात. त्या सगळ्या धावपळीचा थकवा दिवाळी झाल्यानंतर जाणवतोच. तो चेहऱ्यावरही दिसतो. त्वचा खूप थकल्यासारखी, डल दिसू लागते. बऱ्याचदा त्वचा काळवंडून जाते. त्यामुळे त्वचेला पुन्हा नवा टवटवीतपणा द्यायचा असेल तर दही खूप उत्तम पद्धतीने काम करू शकते. पण त्यासाठी दह्याचा वापर अचूक पद्धतीने कसा करावा ते माहिती असायला हवं (skin care tips using curd).. त्यासाठीच या काही खास टिप्स..(how to do curd facial at home?)
त्वचेसाठी दह्याचा वापर कसा करावा?
दह्याचा वापर किती वेगवेगळ्या पद्धतींनी करता येऊ शकतो, याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ rohitsachdeva1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
डाळ बट्टीचा बेत? गव्हाच्या पिठापासून करा खुसखुशीत खमंग बट्टी- घ्या झटपट होणारी सोपी रेसिपी
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दही आणि बेसन सम प्रमाणात एकत्र करा आणि व्यवस्थित कालवून घ्या. त्यानंतर त्वचा थोडी ओलसर करा आणि दही आणि बेसनाचा फेसपॅक त्वचेवर लावा. हलक्या हाताने चोळून मालिश करा आणि त्यानंतर ५ ते ७ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे त्वचेवरची घाण, धूळ, डेडस्किन जाऊन त्वचा नितळ, स्वच्छ होईल.
२. यानंतर दही आणि तांदळाचं पीठ एकत्र करा आणि ते त्वचेवर हलक्या हाताने चोळून लावा. तांदळाच्या पिठामुळे त्वचा छान हायड्रेटेड होते. हा लेपही चेहऱ्यावर २ ते ३ मिनिटे ठेवा आणि त्यानंतर चोळून काढून टाका.
विराट कोहलीच्या अपयशाचं खापर अनुष्काच्या माथी! अनुष्काचे चाहते म्हणाले असं करणं म्हणजे.....
३. तिसरी स्टेप आहे त्वचेला छान पोषण देणारी. यासाठी ॲलोव्हेरा जेल आणि दही सम प्रमाणात एकत्र करा आणि ते चेहऱ्यावर चोळा. साधारण एखादा मिनिट मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका.
४. यानंतर पपईचा किंवा टोमॅटोचा गर काढून घ्या. त्यात बेसन आणि थोडं दही घाला. हा मास्क चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हे सगळे उपाय केल्यानंतर त्वचेवर किती छान ग्लो येतो ते पाहा..
