Body Odor Home Remedy : शरीराला घाम येणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. पण याच घामामुळे शरीराची दुर्गंधी येऊ लागते. ज्यामुळे आपल्याला स्वत:ला तर त्रास होतोच, सोबतच आपल्या आजूबाजूचे लोकही आपल्यापासून दूर पळू लागतात. काही लोकांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसते. आंघोळ केल्यावरही थोड्याच वेळात शरीरातून घामाचा वास येऊ लागतो. यामुळे अनेकदा लाजिरवाण्या परिस्थितीचा सामनाही करावा लागतो. कितीही डिओड्रंट आणि परफ्यूम वापरले तरी काही वेळानंतर दुर्गंधी पुन्हा परत येते. अशावेळी आत्मविश्वास कमी होतो आणि लोकांमध्ये मिसळताना संकोच वाटतो. अशात यावर आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे हा उपाय सोपा आणि एकदम स्वस्त आहे. ज्यानं घामाची दुर्गंधी दूर होते.
फक्त 10 रुपयांत होईल काम
शरीरातून येणारी घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आपण वेगवेळे महागडे प्रॉडक्ट्स वापरतो. पण हे काही तासांपर्यंतच काम करतात आणि नंतर पुन्हा दुर्गंधी येऊ लागते. अशात पण फक्त 10 रुपयांची तुरटी ही समस्या लगेच दूर करू शकते.
काय कराल?
जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर तुरटीचा एक छोटा तुकडा पाण्यात भिजवा आणि ज्या भागात जास्त घाम येतो त्या भागावर लावा. खासकरून काखेत लावा. तुरटी पाण्यात भिजवून घासून लावल्यास परिणाम चांगला होईल. असं रोज केल्याने शरीरातून येणारी घामाची दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी होईल. आपण हवं तर रोज आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवू शकता.
तोंडाची दुर्गंधी सुद्धा होईल दूर
तुरटीचा वापर केवळ शरीराचीच नाही तर तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही केला जाऊ शकतो. तुरटीचा छोटा तुकडा किंवा थोडी पावडर पाण्यात भिजवून ठेवा. ती पूर्णपणे विरघळल्यावर त्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातांवरील घाण निघून जाते आणि तोंडातून येणारा वासही नाहीसा होतो.
महत्वाची बाब म्हणजे हा उपाय स्वस्त, नैसर्गिक आणि परिणामकारक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो घरच्या घरी सहज करता येतो.