lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > उर्फी जावेदच्या ग्लोंईग-स्पॉटलेस त्वचेचं सिक्रेट; किचनमधल्या 'या' ३ वस्तूंचा लावते फेसपॅक

उर्फी जावेदच्या ग्लोंईग-स्पॉटलेस त्वचेचं सिक्रेट; किचनमधल्या 'या' ३ वस्तूंचा लावते फेसपॅक

Urfi Javed's Skincare Tips : उर्फी आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करते याबाबत अनेकांना कल्पना नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 02:13 PM2024-04-19T14:13:41+5:302024-04-19T14:23:34+5:30

Urfi Javed's Skincare Tips : उर्फी आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करते याबाबत अनेकांना कल्पना नाही. 

Urfi Javed's Skincare Tips : Urfi Javed Skincare Routine Includes DIY Face Masks | उर्फी जावेदच्या ग्लोंईग-स्पॉटलेस त्वचेचं सिक्रेट; किचनमधल्या 'या' ३ वस्तूंचा लावते फेसपॅक

उर्फी जावेदच्या ग्लोंईग-स्पॉटलेस त्वचेचं सिक्रेट; किचनमधल्या 'या' ३ वस्तूंचा लावते फेसपॅक

त्वचा ग्लोईंग,सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. ऊन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा काळी पडणं खूपच कॉमन झालंय. (beauty Hacks) त्वचा काळी होऊ नये यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या हटके, विनोदी ड्रेसिंग स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. (Skin Care Tips)

पृथ्वीवर अशी कोणतीही वस्तू नाही ज्याचे ड्रेस बनवून उर्फीने घातला नाही असे सर्वचजण म्हणतात.  ( Urfi Javed Skincare Routine Includes DIY Face Masks) अनेकदा तिच्या ड्रेसिंगमुळे उर्फी ट्रोल होते. उर्फीची त्वचा नेहमी ग्लोईंग दिसते तिच्या चेहऱ्यावर एकही डाग दिसत नाही. (Urfi Javed's Skincare Tips)

उर्फी आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करते याबाबत अनेकांना कल्पना नाही. 
उर्फी जावेदसारखे फेसपॅक तयार करण्यासाठी  सगळ्यात आधी एका वाटीत तांदूळ घ्या त्यात २ ते ३ चमचे पाणी घाला. त्यांतर एका वाटीत मुल्तानी माती, १ चमचा कॉफी पावडर, मध आणि टोमॅटोचा रस घाला एक लिंबू पिळून घाला.

यात सुरूवातीला  घेतलेलं तांदूळाचे पाणी घाला. हा फेस पॅक व्यवस्थित एकजीव करून चेहऱ्याला लावून घ्या.  ब्रशच्या साहाय्याने चेहऱ्याला हा पॅक लावा.  १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. या पाण्यने चेहरा धुतल्यास नव्यासारखी चमक दिसेल. 

टोमॅटो आणि कॉफीचा फेसपॅक  कसा बनवावा?

सगळ्यात आधी टोमॅटोचा अर्धा भाग चिरून घ्या, त्यात कॉफी आणि मध मिसळा, नंतर त्वचेला लावून घासा आणि काही वेळ मसाज करत राहा. जवळपास १५ मिनिटं तसंच लावून ठेवा. त्यानंतर चेहरा  स्वच्छ पाण्याने धुवा.  दुसरी पद्दत अशी की  एका मोठ्या भांड्यात टोमॅटो बारीक करून घ्या. त्यात मध आणि कॉफी मिसळून चेहऱ्यावर या मिश्रणाने मसाज करा. काहीवेळ तसंच ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. या उपायाने चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल.

Web Title: Urfi Javed's Skincare Tips : Urfi Javed Skincare Routine Includes DIY Face Masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.