विशिष्ट वयानंतर केस पांढरे होणं (Grey Hairs Solution) हे खूपच कॉमन आहे. आजकाल कमी वयात लोकांचे केस पिकणं ही खूपच सामान्य समस्या आहे. पांढरे केस लपवण्यासाठी लोक बाजारातील वेगवेगळी केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरतात पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. केसांना एक नैसर्गिक रंग येण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. (Homemade Hair Dye For White Hairs Solution)
घरगुती हेअर डाय तुम्ही कमीत कमी खर्चात कमी कमी वेळात तयार करू शकता. या उपायानं तुमच्या केसांना आतून पोषण मिळेल आणि केस काळेभोर होतील. हा हेअर डाय तयार करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या पानांची आवश्यकता असेल. हा खास उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही. (How To Make Homemade Hair Dye)
घरगुती हेअर डाय करण्याची खास पद्धत (How To make Homemade Hair Dye)
केमिकल्सयुक्त डाय किंवा मेहेंदी न वापरता तुम्ही केस नैसर्गिकरित्या काळे करू शकता. यासाठी जास्वंदाची पानं घ्या तुम्ही कढीपत्तासुद्धा घेऊ शकता. एका लोखंडाच्या कढईत ही पानं गरम करून घ्या. जोपर्यंत व्यवस्थित काळी होत नाहीत तोपर्यंत गरम करा. त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये वाटून या मिश्रणाची बारीक पावडर तयार करून घ्या. (Turn Grey Hair Black In 1 Hour Without Chemical Dye Or Heena Make Dye Natural Black Colur Dye At Home)
त्यानंतर या नॅच्युरल हेअर कलरसाठी पाणी तयार करा. एका भांड्यात एक कप पाणी घ्या. त्यात १ चमचा चहा पावडर, एक चमचा कलौंजीच्या बीया घाला. पाणी अर्ध राहत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या. नंतर १ कप पाणी अर्ध होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या.
मग एका लोखंडाच्या कढईत या पानांची पावडर तयार करून हळूहळू चहा पावडरचं पाणी त्यात मिसळा. हे मिश्रण एकजीव केल्यानंतर कमीत कमी २ तासांसाठी झाकून ठेवा. तुम्ही रात्रभरसुद्धा असंच ठेवू शकता. यामुळे केसांना नैसर्गिक चमक येईल आणि केस शायनी दिसतील.
किती वेळात केसांमध्ये बदल दिसेल
या नॅच्युरल डायची खासियत अशी की तुम्हाला जास्तवेळ केसांवर ठेवावा लागणार नाही. फक्त १ तासात तुम्हाला केसांवर चांगला रिजल्ट पाहायला मिळेल आणि केस नैसर्गिकरित्या काळे दिसू लागतील. आठवड्यातून एकदा मास्कप्रमाणे तुम्ही हा डाय लावू शकता. नंतर शॅम्पूनं हेअर वॉश करा.
या नॅच्युरल हेअर कलरचे काय फायदे आहेत
जर तुम्हाला कोणत्याही केमिकल्सशिवाय केस काळे करायचे असतील तर हा एक सुरक्षित आणि इफेक्टिव्ह पर्याय आहे. याव्यतिरिक्त यात जास्वंदाची पानं, कलौंजी आणि चहा पावडर असते जी केसांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे केसांची वाढ चांगली होते तसंच केस नैसर्गिकरित्याय सॉफ्ट, शायनी होण्यास मदत होते.
